आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • PG Closure Of Two Colleges For Not Providing Facilities To Students Vice Chancellor's Action Against 3 Colleges Without Accredited Teachers, Fine Of Two Lakhs

विद्यार्थ्यांना सुविधा न देणाऱ्या दोन कॉलेजचे पीजी बंद:मान्यताप्राप्त अध्यापक नसलेल्या 3 कॉलेजवर कुलगुरूंची कारवाई, दोन लाखांचा दंड

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला संलग्नित तीन पैकी दोन कॉलेजांचे पीजी बंद केले आहेत. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी शुक्रवारी (5 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता सुनावणी घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा, मान्यताप्राप्त अध्यापक न देणाऱ्या कॉलेजवर कारवाई केली आहे. दोन महिन्यांत अध्यापक भरण्याचे निर्दे दिले आहेत.

कॉलेजला ‘नो अॅडमिशन कॅटेगिरी’त टाकण्याची कारवाई कुलगुरू डॉ. येवले सध्या करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 12 कॉलेजवर कठोर कारवाई केली आहे. शुक्रवारी त्यांनी कॉलेजच्या सुनावणीत संस्थाचालकांची बाजू ऐकली. डॉ. गोपाल बच्छिरे यांचे दाभाडी येथील राजुरेश्वर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयावर अंशत: कारवाई केली आहे. या कॉलेजची डॉ. वाल्मीद सरवदे यांनी पडताळणी केली होती. कुलगुरूंनी कारवाई करताना बीए, बीकॉम, बीएस्सीची प्रत्येकी एक तुकडी कमी केली आहे. तिन्ही विद्याशाखेच्या दोन तुकड्या (120) होत्या त्या आता 60 विद्यार्थी क्षमतेच्या केल्या आहेत. म्हणजेच, आता प्रथम वर्ष प्रवेश क्षमता 360 ऐवजी 180 केली आहे. 2 लाखांचा दंडही केला आहे. अधिसभा सदस्य भगवानसिंग ढोबाळ यांच्या वाघ्रुळ (जहांगिर) येथील राजकँवर कॉलेजमधील बीए, बीकॉम, बीएस्सी, बीबीए, बीसीए, बीसीएसची प्रवेश क्षमता निम्मी कमी केली आहे. एमएस्सी (संगणक), एमस्सी (रसायणशास्त्र), एमकॉम आणि एमलिब हे चार पीजीचे प्रवेश बंद केले आहेत. दोन लाखांचा दंड केला आहे.

कळंब येथील मोहेकर कॉलेजला दिलासा

माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अशोक मोहेकर यांच्या कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर कॉलेजला मात्र दिलासा आहे. या कॉलेजची पडताळणी प्र-कुलगुरू डॉ. शाम शिरसाट यांनी केली होती. मोहेकर कॉलेजच्या पदवी स्तरावर कारवाई केली नाही. कॉलेजचे पीजीचे दोन कोर्स बंद केले आहेत. त्यामध्ये एमए मराठी आणि एमए इतिहासचा समावेश आहे. एमए भुगोलची प्रवेश क्षमता 60 वरून 30 आहे. दोेन लाखांचा दंड केला नाही. पुढील दोन महिन्यांत अध्यापकांची नियुक्तीचे आदेश दिले आहेत.

विद्यापीठात सीएचबी चालते कॉलेजला का नाही..?

राजुरेश्वर कॉलेज संस्थाचालक डॉ. गोपाल बच्छिरे म्हणाले की, विद्यापीठातील पीजीसाठी तासिका तत्वावर अध्यापक चालतात. मग, संलग्नित कॉलेजमध्ये का नाही..? माझ्या कॉलेजमध्ये 22 हॉल आहेत. 9 मान्यताप्राप्त अध्यापक आणि 9 स्थानिक निवड समितीतून घेतले आहेत. तरीही तुकड्या कमी करण्याचे कारण कुलगुरूंनी स्पष्ट केले नाही. अनुदानित कॉलेजमध्येही सावळा गोंधळ आहे. तिकडे दुर्लक्ष का..?.

बातम्या आणखी आहेत...