आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ‘ऑनस्क्रीन’ पद्धतीने सुरू आहे. १८ जानेवारीपासून आतापर्यंत ३० हजारपेक्षा अधिक उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. दररोज तीन हजार उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून मूल्यांकनासाठी परीक्षकांच्या ‘लॉग-इन’वर पाठवले जात आहे. यामुळे दोन ते तीन दिवसांत पीजीच्या काही विषयांचे निकाल लागण्यास सुरुवात होणार आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाने यंदापासून पीजी, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रकिांचे मूल्यांकन ‘डिजिटल व्हॅल्युएशन सेंटरमार्फत सुरू करण्यात आले आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंनी १८ जानेवारी रोजी सेंटर्स सुरू केले आहेत. अभियांत्रिकीचे चार कॉलेज, औषधनिर्माणशास्त्राचे सर्वच कॉलेज, विधीसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांना १७ जानेवारीला सुरुवात झाली होती. एकूण ९ हजार विद्यार्थ्यांच्या ६५ हजार उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पहिल्यांदाच ऑनस्क्रीन पद्धतीने सुरू करण्यात आलेे आहे.
राजर्षी शाहू महाराज परीक्षा भवनात ‘डिजिटल व्हॅल्युएशन सेंटर’ सुरू आहेत. ग्रंथालय व माहितीशास्त्र, संगणक व माहिती तंत्रज्ञानशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र आणि ग्रंथालयासह विविध ठिकाणी स्कॅनिंग सुरू आहे. १५ संगणकावर ३ हजार उत्तरपत्रिकांचे स्कॅनिग दररोज होत आहे. आतापर्यंत पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या १०५ कोर्सच्या ३० हजार ८८७ उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ९ हजार विद्यार्थी आहेत. ६५ हजार उत्तरपत्रिकांची मूल्यांकन या पद्धतीने होणार आहे. आता पुढील दोन ते तीन दिवसांत पीजीच्या काही अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले जाण्याची दाट शक्यता आहे.
परीक्षांना नियुक्त केले विद्यापीठातील ४५ तर उस्मानाबाद उपकेंद्रातील १० शैक्षणिक विभागांमधील पीजी अभ्यासक्रमांसाठी १७४ परीक्षांना ऑनस्क्रीन मूल्यांकनासाठी नियुक्त करण्यात आले आहे. जवळपास ३५० प्राध्यापकांना व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तरपत्रिकांच्या ऑनस्क्रीन मूल्यांकनासाठी नियुक्त केले आहे. पुढील काही दिवसांत पीजीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.