आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वैद्यकीय शिक्षणासाठी रशिया-युक्रेनऐवजी फिलिपाइन्सचा पर्याय

औरंगाबाद | डॉ. शेखर मगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतीय विद्यार्थ्यांसमोर आता परदेशात स्वस्त वैद्यकीय शिक्षणासाठी सहा देशांसह फिलिपाइन्सचा पर्याय उपलब्ध आहे. सध्या या देशात २० हजार भारतीय यूजी आणि पीजीचे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. येथे १८ ते २५ लाखांत वैद्यकीय शिक्षण मिळते. बारावीला ५०% गुण aअन् ‘नीट’मध्ये १६० ते १८० स्कोअर असला तरीही येथे हमखास प्रवेश मिळतो. वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परदेशी पाठवणाऱ्या ३ खासगी इन्स्टिट्यूटच्या संचालकांपैकी दोघांनी विद्यार्थ्यांचे फिलिपाइन्सला प्राधान्य असल्याचे सांगितले. ७ हजार बेटांचा देश असलेला फिलिपाइन्स भारतापासून ४,६३१ किमी अंतरावर आहे. दोन्ही देशांच्या हवामानातही साम्य असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. भारतात येऊन प्रॅक्टिस करण्यासाठी मात्र विद्यार्थ्यांना एक्झिट एक्झाम उत्तीर्ण व्हावी लागेल.

फिलिपाइन्स : नीटचा स्कोअर ७२० पैकी १६० ते १८० हवा; इतक्यावरही मिळतो हमखास प्रवेश
1. अर्हता : पीसीबीत हवेत ५०% गुण
-बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) विषयांत सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ५०% गुण आवश्यक आहेत.
-एससी, एसटी, ओबीसी विद्यार्थ्यांना किमान ४०% गुण हवे.

2. अभ्यासक्रम : ४ वर्षांचा कोर्स
फिलिपाइन्समधील वैद्यकीय शिक्षण साडेचार वर्षाचे. बीएस+एमडी असे कोर्सचे नाव आहे. तो भारतातील एमबीबीएसच्या समकक्ष आहे. कोर्सनंतर एक वर्ष इंटर्नशिप
करावी लागते.

3. शुल्क व खर्च : १८ लाखांत शिक्षण
-प्रतिवर्ष २.५ ते ३ लाख रुपये शैक्षणिक शुल्क आकारले जाते. १८ लाखांत वैद्यकीय शिक्षण पूर्ण होऊ शकते. काही संस्थांत वर्षाकाठी ६ लाख.
-दरमहा १२ ते १५ हजार रुपयांप्रमाणे कोर्स पूर्ण होईपर्यंत ७.९२ लाख खर्च.

प्रवेशाची स्थिती
2019 1 ते 3 लाख विद्यार्थी
2020 50 हजार विद्यार्थी
2021 55 ते 60 हजार विद्यार्थी
2022 1 ते 3 लाख विद्यार्थी

फिलिपाइन्समध्ये ४८ वैद्यकीय संस्था
एमसीआय, डब्ल्यूएचओ, डब्ल्यूएफएमई व एफएआयएमईआर या ४ वैद्यकीय शिखर संस्थांच्या मान्यतेने फिलिपाइन्समध्ये एकूण ४८ कॉलेज आणि विद्यापीठांत वैद्यकीय शिक्षण दिले जाते. त्यामध्ये ४५ संस्थांना एमसीआयची मान्यता आहे. राजधानी मनिला, बॅनिलॅड-मॅन्ड्यू डागूपन येथील वैद्यकीय संस्थांचाही विद्यार्थ्यांना पर्याय आहे.

प्रवेश मिळवण्यासाठी काय करायचे?
प्रवेश अर्जासोबत दहावी आणि बारावीचे गुणपत्रक, आधार कार्ड अथवा अॅड्रेस प्रूफ, पासपोर्ट पाठवणे गरजेचे आहे. १० ते १५ दिवसांत प्रवेश झाल्याचे पत्र येते. त्यानंतर एक वर्षाचे शैक्षणिक शुल्क अदा करायचे, त्याची ओरिजिनल पावती मिळते. व्हिसा मिळवण्यासाठी कागदपत्रे सादर करणे, फिलिपाइन्स दूतावासात मुलाखत घेतली जाते.

सहा देशांना असते विद्यार्थ्यांचे प्राधान्य
कोरोनापूर्वी साधारणत: १ ते ३ लाख विद्यार्थी परदेशांत शिक्षणासाठी जात. पण नंतर ५० हजारापर्यंत हा आकडा खाली आला. आता स्वस्त शिक्षण देणारे इंग्लंड, स्पेन, जर्मनी, बांगलादेश, फिलिपाइन्स आणि किर्गिजस्तान आदी देश आहेतच. या देशांची जास्त चौकशी होते.'
- सुहास महाजन, संचालक, आरटीएम इन्स्टिट्यूट, औरंगाबाद

टॉप - ५ महाविद्यालये/विद्यापीठे आणि शुल्क
1. मेट्रो मलिना येथील युनिव्हर्सिटी ऑफ पर्पेच्युअल हेल्प रिझल 23.25 लाख
2. पोब्लासिएन डिस्ट्रिक्ट येथील डावाओ मेडिकल स्कूल फाउंडेशन 23.85 लाख
3. मेट्रो मलिना येथील अवर लेडी ऑफ फातिमा युनिव्हर्सिटी 27.74 लाख
4. मेट्रो मनिला येथील एएमए स्कूल ऑफ मेडिसिन 18.75 लाख 500
5. इंजेलेस युनिव्हर्सिटी फाउंडेशन 25.11 लाख

बातम्या आणखी आहेत...