आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्दी रसिक:‘फिर छिडी रात बात फुलाें की...’; सूरदरबारची संगीत मैफल रंगली

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राग बागेश्रीतील ‘फिर छिडी रात बात फूलों की..’, तर राग केदारमधील ‘हम को मन की शक्ती देना’ अशा एकाहून एक सुरेल गाण्यांनी ‘सूरदरबार’ची मैफल रंगली. २१ गाणी, २१ संगीतकार आणि २१ रागांची ही अनोखी मैफल होती. स्वरांचे वैविध्य जपणाऱ्या या मैफलीने दर्दी रसिकांची मने जिंकली.

स्व. भानुदासराव चव्हाण नाट्यगृहातील या मैफिलीत प्रसाद साडेकर, डॉ. सुनीता गोपनपल्लीकर, अक्षता मुळे, अनिरुद्ध वरणगावकर आणि वर्षा जोशी हे गायक सहभागी होते. संस्थेच्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त ही मैफिल झाली. ‘ओ घटा सावरी थोडीसी बावरी’ हे जनसंमोहिनी रागातील गीत डॉ. सुनिता गोपनपल्लीकर यांनी गायले. ‘पायलवाली देखना यही’ हे मारुबिहाग रागातील गाणेही उत्तम झाले. राग वृंदावनी सारंग रागातील ‘हाय रे हाय’ हे गाणेही रंगतदार झाले. २१ संगीतकारांच्या गीतांचा यात समावेश असल्याने प्रत्येक स्वभावाच्या व्यक्तीला मोहिनी घालेल अशी गाणी यामध्ये होती.

बातम्या आणखी आहेत...