आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली शहरात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड व भाजपाच्या जन आशिर्वाद यात्रेच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या भाजपच्या बॅनरवरून भाजप नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधव यांचे छायाचित्र गायब झाले आहे. जाधवांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी ते पक्षातच आहे. मात्र त्यानंतरही त्यांचे बॅनरवर छायाचित्र नसल्याने जाधव समर्थकातून तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. हिंगोली जिल्ह्यात भाजपमध्ये नाराजी नाट्य मागील काही दिवसांपासून सुरू आहे. यापूर्वी पक्षाला पुर्णवेळ जिल्हाध्यक्ष नसताना पक्षाच्या नेत्यांनी हिंगोली व सेनगांव तालुका वगळता इतर तालुक्यात फारसा प्रभाव दाखवता आलेला नाही.
केवळ हिंगोली विधानसभा मतदार संघात भाजपचे वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न झाला होता. दरम्यान भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर भाजप नेते शिवाजी जाधव यांनी खऱ्या अर्थाने पक्षाला इतर विधानसभा मतदार संघात संधी मिळवून दिली. वसमत विधानसभा मतदारसंघांमध्ये केवळ नावाला असलेल्या भाजपला शिवाजी जाधव यांच्या पुढाकारातून चांगले दिवस आले. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत वसमत विधानसभा मतदारसंघात भाजपचे 6 सदस्य निवडून आले, तर वसमत पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकला.
हिंगोली जिल्ह्यात शिवाजी जाधव यांचे कार्य लक्षात घेऊन त्यांची भाजपचे नेते तसेच जिल्हाध्यक्ष म्हणून चांगलीच ओळख निर्माण झाली. त्यामुळे त्यांना जिल्हाध्यक्ष कमी व भाजप नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. हिंगोली जिल्ह्यात भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात उभारल्या जाणाऱ्या बॅनर व त्यांचे छायाचित्र झळकू लागले होते. दरम्यान जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच प्रकृतीच्या कारणामुळे भाजपा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंजूरही केला. जाधव यांनी राजीनामा दिला असला तरी भाजप मध्येच काम करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे सध्या ते भाजप मध्ये कार्यरत आहेत.
भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेच्या स्वागतासाठी हिंगोली शहरांमध्ये ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. यामध्ये जन आशीर्वाद यात्रा तसेच भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या स्वागताच्या बॅनर वरून भाजप नेते शिवाजी जाधव यांचे छायाचित्र गायब झाले आहे. त्यामुळे जाधव समर्थकांकडून तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी वरून भाजपच्या महत्वाच्या नेत्याचा फोटोही नसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
भाजप नेते जाधव यांचे छायाचित्र असणे गरजेचे
भाजपा नेते शिवाजीराव जाधव यांनी प्रकृतीच्या कारणावरून पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असला तरी ते अद्यापही भाजपा मध्येच आहेत त्यामुळे भाजप नेते म्हणून त्यांचे बॅनर वर छायाचित्र असणे आवश्यक होते - खोब्राजी नरवाडे भाजपा तालुका अध्यक्ष वसमत
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.