आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध उपक्रम:फुले जयंती, भीमोत्सवाची जय्यत तयारी, समित्या स्थापन; वृक्षारोपण, रक्तदान, अन्नदान राबवणार

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी सर्वपक्षीय महासमिती स्थापन करण्यात आली. त्याअंतर्गत १० ते १४ एप्रिलदरम्यान विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महासमितीचे नवनर्वाचित अध्यक्ष राजू शिंदे व कार्याध्यक्ष अरुण बोर्डे यांनी दिली. यासंदर्भात ५ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जयंती काळात तीन दिवस दारू दुकाने बंद ठेवण्यात यावीत, अशी मागणी उत्पादन शुल्क विभागाकडे करण्यात येणार आहे. यावेळी अॅड. रमेशभाई खंडागळे, दिनकर ओंकार, गौतम खरात, प्रा. सुनील मगरे, अनिल भिंगारे, किशोर थोरात, जालिंदर शेंडगे, बंडू कांबळे, विजय मगरे, रूपचंद वाघमारे, कमलेश चांदणे, प्रसिद्धिप्रमुख सचिन अंभोरे आदी उपस्थित होते.

१० ते १४ एप्रिल दरम्यान कार्यक्रम
१० एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपासून महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता व अभिवादन केले जाईल. शहर सुशोभीकरण व निळे व पंचशील ध्वजही लावण्यात येतील. ११ एप्रिल रोजी विविध ठिकाणी ४००० बोधिवृक्ष लावण्यात येणार आहेत. १२ एप्रिल रोजी छावणी येथे बाबासाहेब वास्तव्यास असलेल्या बंगला नं. ९ जवळ भीम रजनी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता शिवराय ते भीमराय ही भीमज्योत काढण्यात येणार आहे. रात्री १२ वाजता क्रांती चौक तसेच भडकल गेटपर्यंत फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. गुरुवारी १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आंबेडकर चळवळीत योगदान देणाऱ्या ज्येष्ठांचा सन्मान तसेच सनदी अधिकारी, न्यायाधीश, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

औरंगाबाद | महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलतर्फे ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त महात्मा जोतिराव फुले जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात संस्थापक अध्यक्ष मनोज घोडके, उत्सव समिती अध्यक्षपदी आनंदा ढोके, कार्याध्यक्ष-चंद्रकांत पेहरकर, स्वागताध्यक्ष-निशांत पवार, सरचिटणीस-गणेश काळे, उपाध्यक्ष-सुरेश बनसोड, गजानन सोनवणे, संदीप घोडके, योगेश हेकाडे, लक्ष्मण हेकडे, अनिल क्षीरसागर, किशोर लोखंडे, ज्ञानेश्वर जेजूरकर, सुरेश गाजरे, सचिव-गणेश हिवाळे, चैतन्य चोपडे, बाळू सोनवणे, अर्जुन सोनवणे, विकास श्रीखंडे, वामन भागवत, दौलत नांगरे आदी.

बातम्या आणखी आहेत...