आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नांदेड येथील विष्णुपुरी भागातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरील नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या नाल्यात एका अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे डुकरांच्या कळपाने लचके तोडल्याची घटना बुधवारी (ता.20) सकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान, या किळसवाण्या प्रकाराचा नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ, रहदारी आणिक रात्री पोलिसांची पेट्रोलिंग असताना हा प्रकार कोणाच्याच लक्षात कसा आला नाही, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील विष्णुपुरी भागातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नांदेड जिल्ह्यासह शेजारील परभणी, हिंगोली तसेच तेलंगना राज्यातील रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. त्यामुळे याठिकाणी मोठ्या संख्येने वर्दळ असते. दरम्यान, बुधवारी सकाळी रुग्णालयासमोरील नाल्यात बेवारस मृतदेहावर डुकरांचा कळप लचके घेत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाला ही माहिती दिली. यानंतर रुग्णालय प्रशासनाने ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
तीन दिवसांपासून अज्ञात व्यक्ती फिरत होता
मागील दोन ते तीन दिवसांपासून सदरील अज्ञात व्यक्ती या परिसरात फिरत होता. मंगळवारी (ता.19)ही सायंकाळपर्यंत तो नेहमी प्रमाणे याच ठिकाणी दिसून आला. तसेच तो प्रकृतीने ठणठणीत होता. मात्र, दुसर्या दिवशी बुधवारी (ता.20) सकाळी त्याचा अचानक मृतदेह नाल्यात आढळला. त्यावर डुकरांचा कळप लचके घेत होता, अशी घटना स्थळी चर्चा होत होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.