आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिक त्रस्त:ज्योतीनगरच्या रामकृपा म्हाडा काॅलनीच्या मैदानात ढिगारे; डीपीमधील तारा उघड्या

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतीनगरमधील रामकृपा म्हाडा कॉलनीतील मैदानाच्या भिंती पडल्या आहेत. बांधकामानंतरचा सर्व कचरा मैदानात आणून टाकण्यात आला आहे. मैदानात मोठ्या प्रमाणावर गवत, मातीचे ढिगारे तयार झाले आहेत. मैदानातील महावितरणच्या डीपीच्या तारा उघड्या आहेत. कचऱ्याचे ढिगारे हटवावेत तसेच विजेच्या उघड्या तारा सुस्थितीत कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

ज्योतीनगरमधील रामकृपा म्हाडा कॉलनी या परिसरात मोठे मैदान आहे. महानगरपालिकेने तेथे खुले व्यासपीठ तयार केले आहे. तेही मोडकळीस आले आहे. या मैदानात बांधकामाचे वेस्टेज मटेरियल टाकल्यामुळे मोठे ढिगारे झाले आहेत. गवत उगवले आहे. तेथे कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. मैदान व बालवाडीमधली भिंत पडलेली आहे. याच मैदानात महावितरणने परिसराला वीजपुरवठा करण्यासाठी डीपी लावली आहे. तिच्या तारा उघड्या आहेत. त्यामुळे तिथे पडलेल्या कचऱ्याला आग लागू शकते आणि मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिकांना सतावत आहे. महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कचरा हटवला जात नाही, कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नाही. या सर्व समस्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.

लहान मुलांनी खेळायचे कसे? मैदानात कचऱ्याचे ढिगारे आहेत. दारूच्या बाटल्या, फुटलेल्या बाटल्यांच्या काचा पसरलेल्या आहेत. मैदान त्वरित स्वच्छ करावे. - अब्दुल रहमान, रहिवासी

कचऱ्याचे ढिगारे उचला लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान आहे. त्याचा उपयोग करणे कठीण झाले आहे. मातीचे मोठमोठे ढिगारे पडलेले आहेत, ते उचलण्यात यावे. डीपीच्या उघड्या केबल त्वरित दुरुस्त कराव्यात. - सदानंद साक्रीकर, रहिवासी

ढिगारे हटवण्यासाठी लवकरच मोहीम शहरातील विविध भागांत कचऱ्यांचे ढिगारे हटवण्यासाठी मनपाच्या वतीने मोहीम राबवणार आहोत. जेसीबीच्या साहाय्याने तो पूर्ण कचरा काढण्यात येईल. तसेच इतर अडचणीही सोडवण्यात येतील. - नाना पाटील, वॉर्ड अभियंता, मनपा

बातम्या आणखी आहेत...