आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नांदेड कोरोना:कोरोना चाचणी झाल्यानंतर यात्रेकरुंना त्यांच्या राज्यात पाठवले जाईल, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नांदेडएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • नांदेडमध्ये आतापर्यंत 51 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

नांदेड येथे अडकेल्या 200 पेक्षा जास्त यात्रेकरुंना कोरोना चाचणी झाल्यानंतर त्यांच्या राज्यात पाठवले जाईल, अशी माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांनी दिली. नांदेड येथील हुजुर साहेब गुरुद्वारा येथे पंजापमध्ये हजारोच्या संख्येने भक्त येत असतात. काही दिवसांपूर्वी नांदेडमधून शेकडोच्या संख्येने पंजाबचे नागरिक परत आपल्या राज्यात गेले आणि तिथे त्यांची कोरोना चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर प्रशासनाकडून दोन्ही ठिकाणे बंद करण्यात आली आहेत.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, ' उत्तर प्रदेश, हरियाणा आणि इतर राज्यातील जवळपास 225 लोक लंगर साहेब येथे अडकले आहेत. आम्ही त्यांची चाचणी करणार आहोत आणि आतापर्यंत 110 जणांचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. यापैकी सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्टमध्ये समोर आले आहे.'

पुढे ते म्हणाले की, 'सर्वांच्या चाचण्या झाल्यावर आणि त्यांच्या राज्यांकडून परवानगी मिळाल्यावर हळुहळू या नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठवले जाईल. यासाठी दोन-तीन दिवसांचा वेळ लागू शकतो. सध्या आम्ही लंगर साहेबमधील एका इमारतीला कोव्हिड सेंटर बनवले आहेत. नांदेडमध्ये सध्या 51 कोरोना बाधित रुग्ण आहेत. यापैकी दोन जण बेपत्ता झाले आहेत. पोलिसांकडून यांचा शोध घेतला जात आहे,' अशी माहिती त्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...