आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पौर्णिमा:‘अबला’ पुरुषांकडून वाळूज येथील आश्रमामध्ये पिंपळ पौर्णिमा साजरी ; झाडाची लागवड करून ओट्याची व्यवस्था

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘जन्मोजन्मी हाच पती मिळू दे’ असे साकडे घालत महिला दरवर्षी वटसावित्री पौर्णिमा साजरी करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून पत्नीपीडित पतींच्या संघटनेतर्फे पिंपळाच्या झाडाला उलट फेऱ्या मारून ‘सात जन्मच काय, पण सात सेकंदसुद्धा भांडखोर बायको नको’ असे साकडे घातले जाते. १३ जून रोजी वाळूज परिसरातील पत्नीपीडित संघटनेच्या आश्रमात हा कार्यक्रम झाला. पत्नीकडून वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असणारे ‘पत्नीपीडित’ पुरुष यात सहभागी झाले होते. संघटनेचे तथा आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. भारत फुलारे, भाऊसाहेब साळुंके, पांडुरंग गांडुळे, सोमनाथ मनाळ, चरणसिंग गुसिंगे, भिकन चंदन, संजय भांड आदींची उपस्थिती होती. दरवर्षी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारता याव्यात यासाठी फुलारे यांनी आश्रमाच्या परिसरात पिंपळाच्या झाडाची लागवड करून ओट्याची व्यवस्था केली आहे. ज्यांच्यावर पत्नीकडून २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, त्यांनाच आश्रमात कायमस्वरूपी प्रवेश मिळतो. सध्या या आश्रमात असे सहा लोक आहेत. संपूर्ण भारतातून ९,६०० पेक्षा अधिक पत्नीपीडित पुरुषांनी नोंद केली आहे. यात महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, उत्तराखंड आदी राज्यातील पुरुषांचीसुद्धा नोंद असल्याचे अॅड. भारत फुलारे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...