आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून अश्‍लील भाषेत शिवीगाळ करणारा पिंपळदरीचा जमादार निलंबित, पोलिस अधिक्षकांनी काढले आदेश

हिंगोली2 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • निलंबनाचे आदेश पोलिस अधिक्षक कलासागर यांनी काढले

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे यात्रा काळात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून अश्‍लित भाषेत शिवीगाळ करणाऱ्या जमादारावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली असून या बाबतचे आदेश पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी गुरुवारी ता. ४ काढले आहेत.

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे ता. ३० जानेवारी रोजी झालेल्या यात्रेमध्ये बिट जमादार मिर हिदायत अली हे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्रशान करून अश्‍लिल भाषेत शिवीगाळ करीत होते. हा प्रकार गावकऱ्यांनी त्यांच्या सहकार्ऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही तुम्हाला काय करायचे ते करा, खोट्या गुन्हयात अडकवून जेलमध्ये टाकीन अशी धमकी दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता.

सदर जमादारावर कारवाईच्या मागणीसाठी या संदर्भात माजी आमदार डॉ. संतोष टारफे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतिष पाचपुते यांच्यासह बापुराव घोंगडे, रत्नमाला भुरके, अनिता फलटणकर, शांताबाई रिठ्ठे, शारदा मुकाडे, सरजाबाई मारकड, शिवकन्या बुरकुले, अरुणाबाई काळे, अंजनाबाई काळे, मथुराबाई रिठ्ठे यांच्यासह गावकऱ्यांनी बुधवारी ता. ३ पोलिस अधिक्षक कलासागर यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला.

त्यानंतर आज जमादार मिर हिदायत अली यांना निलंबीत करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश पोलिस अधिक्षक कलासागर यांनी काढले आहेत.

बातम्या आणखी आहेत...