आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:कोल्हापूर-कर्नाटकच्या सिमेवर मिळताहेत 7000 रुपयांमध्ये पिस्तुल, हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या चौकशीत उघड

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चौकशीसाठी हिंगोली पोलिसांचे पथक कर्नाटकात रवाना होणार आहे

सेनगाव तालुक्यातील बोडाखातांडा येथील अटक केलेल्या दोघांची स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीमध्ये कोल्हापूर-कर्नाटकाच्या सिमेवर ७००० रुपयांमध्ये पिस्तुल मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार आता पोलिसांचे पथक कर्नाटकात रवाना होणार आहे. तर या प्रकरणात मध्यस्थी करणारे नांदेड व हिंगोली जिल्हयातील काही जणांची चौकशी होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने बोडखा या गावात ता. ४ डिसेंबर रोजी छापा टाकून धनसिंग उर्फ भाऊ शेषराव राठोड व नवनाथ शेषराव राठोड यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल, तीन जिवंत काडतुसं, एक छर्ऱ्याची बंदूक, खंजीर जप्त केली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडीत कच्छवे, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे यांच्या पथकाने त्या दोघांची चौकशी सुरु केली.

या चौकशीमध्ये एक वर्षापुर्वी ऊसतोडीसाठी गेल्यानंतर कोल्हापूर- कर्नाटकच्या सीमेवरून ७००० रुपयांमध्ये पिस्तुल खरेदी केल्याचे सांगितले. या शिवाय हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील मध्यस्थीने हि पिस्तुल खरेदी केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. मात्र रानडुकरे मारण्यासाठी सदर पिस्तुल खरेदी केल्याचे धनसिंग राठोड याने चौकशीत सांगितले. मात्र पिस्तुल डुकरे मारण्यासाठी खरेदी केले तरी छर्ऱ्याची बंदूक कशासाठी घेतली, खंजीर कशासाठी बाळगला याची चौकशीही पोलिसांनी सुरु केली आहे. तर पोलिसांचे पथक लवकरच कोल्हापूर-कर्नाटकच्या सिमेवर जाऊन कोणत्या गावातून पिस्तुल खरेदी केले याची माहिती घेणार आहेत. या शिवाय नांदेड व हिंगोली जिल्हयातील काही जणांचीही या प्रकरणात चौकशी होणार असल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पोलिस अधीक्षकांचे तपासाबाबत मार्गदर्शन

सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी तपासाबाबत स्थानिक गुन्हे शाखेला वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. पिस्तुल व जिवंत काडतुस याचे प्रकरण गंभीर असल्याने त्याच्या मुळाशी जाऊन तपास करण्याबाबत सूचनाही कलसागर यांनी दिल्या आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser