आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाधान हेल्पलाइनचे लोकार्पण:खड्डे, ड्रेनेज, कुत्रे, साफसफाईची मनपाकडे तक्रार करायचीय; डायल करा 155304

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागरिकांच्या तक्रारी साेडवण्यासाठी महापालिकेने ‘समाधान’ हेल्पलाइन सुरू केली आहे. पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते शुक्रवारी हेल्पलाइनचे लोकार्पण झाले. आता १५५३०४ या क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात.विविध तक्रारींसाठी नागरिकांना वॉर्ड कार्यालय, मनपा मुख्यालयात खेट्या माराव्या लागतात. रस्त्यावरील खड्डे, ड्रेनेजलाइन चोकअप होणे, साफसफाई, अतिक्रमण, विविध प्रमाणपत्र वेळेत न मिळणे, कर आकारणीसंदर्भात तक्रारी घेऊन नागरिक थेट आयुक्तांना भेटतात. त्यात अनेक वयोवृद्धांचा समावेश असतो. त्यामुळे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी मनपा व स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना विशेष हेल्पलाइन सुरू करण्याचे आदेश दिले होते. यासाठी उपायुक्त संतोष टेंगळे यांची नोडल अधिकारी, स्मार्ट सिटीतर्फे प्रकल्प व्यवस्थापक फैज अली यांची निवड करण्यात आली हाेती. या हेल्पलाइनचे शुक्रवारी स्मार्ट सिटी कार्यालयात लोकार्पण करण्यात आले. या वेळी आमदार प्रदीप जैस्वाल, डॉ. चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...