आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅकेज:कोविडकाळात फॉरेन्सिकच्या विद्यार्थ्यांची प्लेसमेंट घटली 50 टक्क्यांपर्यंत, पॅकेज मात्र 10 ते 15 लाखांपर्यंत कायम

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फॉरेन्सिक सायन्समधून पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. औरंगाबाद शहरातील शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्थेतील पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना गेल्या तीन- चार वर्षात कॅम्पस मुलाखतीतून कमाल १० ते १५ लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळाली असल्याची माहिती विभागातील प्रा. राजेश कुमार यांनी दिली. कोरोनापूर्वीच्या काळात कंपन्यांमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण सुमारे ७५ टक्क्यांपर्यंत होते, ते मागील दोन वर्षात २५ ते ५० टक्क्यांनी घटले, पण पॅकेजमध्ये फारसा फरक पडलेला नाही.

शासकीय तसेच खासगी संस्थांमध्येही या अभ्यासक्रमानंतर तरुणांना चांगल्या संधी उपलब्ध आहेत. येत्या काळात फॉरेन्सिक सायन्यसचे खासगी क्षेत्रात महत्त्व वाढणार आहे. केंद्र शासनही फॉरेन्सिक सायन्सला प्रोत्साहन देत आहे. या विषयात पदवी पूर्ण घेतल्यानंतर ९५ टक्के विद्यार्थी हे नोकरी करण्याएेवजी पदव्युत्तर पदवी करण्यासाठी प्राधान्य देतात. पदव्युत्तर पासनंतर कॅम्पस मुलाखतीतून गेल्या वर्षी निवड झालेल्या डेटा सायन्सच्या दोन ते तीन विद्यार्थ्यांना कमाल १० ते १५ लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. यात तीन स्तरांवर निवड प्रक्रिया केली जाते. प्रथम वैयक्तिक एचआर स्तरावर होते. त्यांनतर टेक्निकल आणि नंतर पुन्हा एचआर स्तरावर ही निवड केली जात असल्याचेही राजेशकुमार यांनी सांगितले.

या क्षेत्रात आहेत संधी
आयटी इंडस्ट्रीजमध्ये सुरक्षा पुरवणे, फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये रसायनतज्ज्ञ, पोलिसांचे सायबर सेल, मनोरुग्णालयांमध्ये सायको अॅनालिस्ट, पोलिस प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षक, खासगी गुप्तहेर संस्था, एमपीएससी आणि यूपीएससीच्या माध्यमातून अन्न व औषध प्रशासन आदी क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत.

३० टक्के उमेदवार अध्यापनाकडे
फॉरेन्सिक सायन्स हे विविध शाखांना जाेडणारे क्षेत्र आहे. त्यात इंजिनिअरिंग, फिजिक्स, कॉम्प्युटर सायन्स या सर्व विषयांचा संबंध येतो. भविष्यात सरकारीसोबतच खासगी संस्थांमध्ये या क्षेत्रातील नोकरीच्या संधी वाढतील. एमएस्सी झालेले बरेच विद्यार्थी सध्या खासगी संस्थेत कार्यरत आहेत. काहींनी स्वत:चे कामदेखील सुरू केले आहे. ९० टक्के खासगी क्षेत्रात संधी आहेत, तर ३० टक्के तरुण अध्यापन क्षेत्रातही करिअर निवडतात. - प्रा. राजेशकुमार, शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्था, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...