आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद:संतांच्या नामफलकापुढे लावल्याने भाजपच्या सभेचे फलक फाडले

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संत सेवालाल महाराजांच्या नामफलकापुढे लावले म्हणून बंजारा ब्रिगेडने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सभेचे फलक फाडून टाकले. लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकण्यासाठी नड्डा यांची सभा २ जानेवारी रोजी औरंगाबादेत झाली. सभेच्या प्रचार, प्रसाराचे फलक शहरभर लावण्यात आले. तसे ते हायकोर्टासमोरील चौकात लावले होते. ते बंजारा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दुपारी फाडले. संत सेवालाल महाराजांच्या नामकरण फलकाच्या समोर होर्डिंग लावण्यात आल्याने ते फाडण्यात आल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. दरम्यान, या प्रकाराबद्दल भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया सोमवारी रात्री उशिरापर्यंत आली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...