आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील ‘चला जाणूया नदीला’ या अभियानामध्ये शिवना, दुधना आणि खाम नद्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘नदी संवाद यात्रे’त लोकसहभाग घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिले. नद्यांना प्रदूषणमुक्त करण्याच्या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पांडेय यांनी आढावा बैठकीत घेतले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे.
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात “चला जाणूया नदीला’ हे अभियान राबवण्यात येत आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील नद्यांची स्वच्छता तसेच विद्यार्थी युवकांमध्ये जनजागृती आणि नदीबाबत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. खाम नदीपासून औरंगाबाद जिल्ह्यातील या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. खाम नदीच्या पुनरुज्जीवन अभियानाची ध्वनिचित्रफीत देखवून या बैठकीला प्रारंभ झाला. प्रदूषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भूपृष्ठजलाची घटती उपयुक्तता, नद्यांमध्ये तसेच जलाशयामध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची घटलेली साठवण क्षमता याचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्याची गरज जिल्हाधिकारी पांडेय यांनी या वेळी अधोरेखित केली. या पार्श्वभूमीवर, ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रमाचे महत्त्व त्यांनी मांडले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वप्रथम नदीचे आरोग्य जाणून घेऊन नदीचे आजार काय आहेत हे माहिती करून घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी आप्पसाहेब शिंदे, अभियानाचे समन्वयक गोकुळ सुरासे तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.