आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:चार दिवसाला पाणीपुरवठा करण्याबाबत नियोजन सुरू : जिल्हाधिकारी चव्हाण

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शहरातील पाणीपुरवठ्याविषयी बैठका घेत आहेत. त्यात अधिकाऱ्यांनी पाच दिवसाला पाणीपुरवठा केल्याचा दावा केला होता. याविषयी ‘दिव्य मराठी’ने शहरातील सिडको-हडको, हनुमान टेकडी परिसराची पाहणी केली असता नागरिकांनी सातव्या दिवशी पाणी मिळते, अशी माहिती दिली होती. याबाबत १९ जून रोजी ‘दिव्य मराठी’ने बातमी प्रकाशित केल्यानंतर रविवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सिडको-हडको परिसरातील नागरिकांची भेट घेत पाण्याबाबत पाहणी केली. हनुमान टेकडी परिसरात पाण्याच्या व्हॉल्व्ह दुरुस्ती तसेच इतर सूचना देत पाणी वाढवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नागरिकांसोबत संवाद साधत चार दिवसाला पाणीपुरवठा करण्याबाबत नियोजन सुरू असल्याचे ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. शहरातील भीषण पाणीटंचाई दूर करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. त्यात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात काही प्रमाणात मनपाला यश मिळत असल्याचे दावे प्रशासनाकडून केले जात आहेत.

त्या अनुषंगाने ‘दिव्य मराठी’ने शहरातील सिडको, हडको, हनुमान टेकडी भागातील नागरिकांच्या पाण्याच्या समस्या कितपत सुटल्या याविषयी जाणून घेतले असता, सिडको-हडको परिसरातील नागरिकांनी ७ दिवसालाच पाणी मिळत असल्याचे सांगितले. तर हनुमान टेकडी परिसरातील नागरिकांनी पूर्वी १५ दिवसांआड येेणारे पाणी ७ दिवसाला येत असून रात्री-अपरात्री येण्याचे सत्र थांबलेले नसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...