आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनौषधी:छावणी गणेश महासंघातर्फे 75 औषधी वनस्पतींचे रोपण ; नेहरू उद्यानात 75 वृक्षांची लागवड

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छावणी गणेश महासंघातर्फे छावणी परिसरातील देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याजवळील मोकळ्या जागेत ७५ विविध औषधी वनस्पतींचे रोपण करण्यात आले.सध्या मोठ्या प्रमाणात वनौषधी नामशेष कोणाच्या मार्गावर आहेत. यासाठी महासंघाचे अध्यक्ष अशोक आमले यांनी छावणी परिसरामध्ये औषधी वृक्ष लावण्यासंदर्भात जनसहयोग संस्थेमार्फत उपलब्ध असलेल्या वृक्षांची लागवड केली. याप्रसंगी छावणी गणेश महासंघाचे प्रमुख सल्लागार अशोक यादव, रखमाजी जाधव, छावणी परिषदेचे सदस्य प्रशांत तारगे, माजी उपाध्यक्ष किशोर कच्छवाह, बॉबी डिंगरा, जनसहयोग संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गिरे, संदीप जगधने, कैलाश खांडरे, श्याम जयपल्लीपकर, रशीदभाई आदी उपस्थित होते. यासाठी छावणी परिषद अधिकारी संजय सोनवणे यांनी सहकार्य केले. हुंभ, टिवस, शमी, पारिजात, काळा शिसम, पुत्र जिंवा, अर्जुन, बेहडा आदी प्रजातींचे वृक्ष लावले आहेत.

बातम्या आणखी आहेत...