आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणाव:आझाद चौक रस्त्यावर प्लॉटिंग एजंट भिडले ; पाच जणांना गुन्हा दाखल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आझाद चौकात गुरुवारी दुपारी जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांचे गट भिडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांना ही बाब कळताच त्यांनी गर्दीला पांगवून पाच जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. अतिक अताऊर रहमान खान (३४, रा. एन-६), नासेद खान लाल खान (४५, रा. रहमानिया कॉलनी), सय्यद माजिद सय्यद अब्दुल करीम (३१), शमीद अब्दुल करीम (४०), खान शाकेर हाजीलाल (३९, रा. सर्व रा. रहमानिया कॉलनी) यांच्यात सर्वप्रथम वाद सुरू झाला. पाचही जणांचे साथीदार वाद सुरू असतानाच एकमेकांना भिडले व हाणामारी सुरू झाली. स्थानिकांनी ही बाब नियंत्रण कक्षाला कळवली. सिडको पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, अंमलदार सुभाष शेवाळे व इतरांनी धाव घेत जमावाला पांगवले. त्यानंतर सर्व प्लॉटिंग एजंटना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...