आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाभार्थ्यांचा सत्कार:हिंगोलीच्या तीन लाभार्थ्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्कृष्ट घरकुल बांधकामाबद्दल सत्कार, मुख्याधिकाऱ्यांच्या कामाचेही केले कौतूक

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहनिर्माण सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या हस्ते या लाभार्थ्यांचा ऑनलाईन सत्कार करण्यात आला

राज्यात उत्कृष्ट घरकुल बांधकामांबद्दल हिंगोली पालिकेअंतर्गत तीन लाभार्थ्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहनिर्माण सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते शुक्रवारी ता. १ सत्कार करण्यात आला. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या कामाचे कौतूक केले. राज्यातील केवळ हिंगोली पालिकेच्याच लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

राज्यात प्रधानमंत्री आवास योजना राबवली जात असून या योजनेमध्ये सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरकुल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार राज्यात घरकुलांचे बांधकाम केले जात आहे. यामध्ये घरकुलांचे उत्कृष्ट बांधकाम करण्यासाठी प्रशासकिय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, केंद्र शासनाने या योजनेमध्ये सन २०२०-२१ या वर्षासाठी संपूर्ण देशात घरकुल स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत हिंगोली पालिकेने सहभाग घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या पथकाने १० घरकुल लाभार्थींच्या घरकुलांचे छायाचित्र व छायाचित्रीकरण करून केंद्र शासनाकडे पाठविले होते. या स्पर्धेचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहिर करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील ३ लाभार्थ्यांची निवड झाली असून त्यात हिंगोलीच्याच सुमन बोरकर, शोभा मुंडे, जिजा लोथे यांचा समावेश आहे.

दरम्यान, शुक्रवारी ता. १ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहनिर्माण सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या हस्ते या लाभार्थ्यांचा ऑनलाईन सत्कार आला. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. कुरवाडे यांच्या कामाचेही कौतूक करण्यात आले. या कार्यक्रमानंतर तीनही लाभार्थ्यांचा पालिकेच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह नगरसेवकांनी लाभार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. कार्यक्रमास रत्नाकर अडशिरे, उमेश हेंबाडे, शाम माळवटकर, विनय साहु, अभियंता विजय इटकापल्ले यांची उपस्थिती होती.

हिंगोली शहरात घरकुलांवर १४.२० कोटी खर्च : डॉ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी हिंगोली पालिका

हिंगोली शहरात प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये १०९८ घरकुले मंजूर झाले असून आता पर्यंत ५३४ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. शासनाकडून १४.६६ कोटींचा निधी प्राप्त झाला असून त्यापैकी १४.२० कोटींचा खर्च झाला आहे. उर्वरीत घरकुले तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...