आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूमोनिया:वर्षभरात औरंगाबाद जिल्ह्यात न्यूमोनियाने 171 बालकांचा मृत्यू, सर्वाधिक धोका दोन महिने ते दोन वर्षांपर्यंतच्या बालकांना

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • न्यूमोकोकल आजार हा न्यूमोनियाचे कारण ठरत आहे.

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. दुसरी लाट अजून ओसरली नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर कोरोनाची तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक ठरणार असल्याचा तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्यक्त केला जात आहे. गेल्या वर्षभरात कोरोनाकाळात न्यूमोनियाने जिल्ह्यात १७१ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागातून मिळाली आहे.

न्यूमोकोकल आजार हा न्यूमोनियाचे कारण ठरत आहे. संसर्गजन्य असलेला हा आजार खोकला आणि शिंकल्याने पसरतो. या आजाराचा सर्वाधिक धोका दोन महिने ते दोन वर्षांपर्यंतच्या बालकांना आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत १७१ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे न्यूमोकोकल आजारापासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण मोहिमेत पीसीव्ही लसीचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोफत दिली जात आहे. जिल्ह्यात दरवर्षी अंदाजे ४० ते ४४ हजार बालकांचा जन्म होतो, या सर्व बालकांना एक वर्षापर्यंत या लसीचे तीन डोस देण्यात येणार आहेत. नुकतेच या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आरोग्य सभापती अविनाश गलांडे पाटील यांच्या उपस्थितीत दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करण्यात आला.

अशी आहे मृत्यू झालेल्या बालकांची आकडेवारी -
औरंगाबाद ४०, गंगापूर १८, सोयगाव ५ वैजापूर १३, सिल्लोड १२, कन्नड १६, खुलताबाद १४, पैठण ३४, फुलंब्री १९ आदी.

१२ जुलै पासून पीसीव्ही लसीकरण
लहान मुलांना न्युमोकोकल आजारांपासून संरक्षण देण्यासाठी १२ जुलै पासून पीसीव्ही लसीचा समोवश लसीकरणात करण्यात आलेला आहे. सर्व आरोग्य केंद्रांमध्ये हि लस उपलब्ध असणार असून, यामुळे बालकांचे न्युमोनियामुळे होणारे मृत्यू टाळता येतील.
- डॉ. सुधाकर शेळके जि.प.आरोग्य अधिकारी

बातम्या आणखी आहेत...