आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नियमांचे उल्लंघन:नांदेडमध्ये संचारबंदीत पाेलिसांकडून ‘प्रसाद’ वाटप, अनेकांना झाला ‘लाभ’

नांदेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वीच्या संचारबंदीपेक्षा यावेळी प्रशासनाने संचारबंदी बरीच गांभीर्याने घेतल्याचे दिसून आल

जिल्ह्यात मध्यरात्रीपासून संचारबंदीचा अंमल सुरू झाला. यापूर्वीच्या संचारबंदीपेक्षा यावेळी प्रशासनाने संचारबंदी बरीच गांभीर्याने घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरातील बहुतांश भागातील रस्ते निर्मनुष्य दिसून आले. काही भागात अनेक जण विनाकारण घराबाहेर पडले असता पाेलिसांनी त्यांना लाठ्यांचा प्रसाद दिला. दरम्यान, हा लाॅकडाऊन कोरोनाला नियंत्रित करू शकतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रशासनाने सकाळी १० वाजेपर्यंत दूध आणि भाजीपाला विक्रीसाठी सूट दिल्याने सकाळच्या वेळी शहरातील रस्त्यावर तुरळक गर्दी दिसली. काही लोक नित्याप्रमाणे बाहेरही पडले. परंतु सकाळी १० नंतर जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर व जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर खुद्द रस्त्यावर उतरले. त्यांनी रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची कसून तपासणी केली. यावेळी काही लोकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसादही मिळाला. त्यामुळे संचारबंदीचा प्रभाव दिसण्याला सुरुवात झाली. यावेळी प्रशासनाने औषधी दुकाने सोडून इतर सर्व व्यवहार बंद केल्याने शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट राहिला. भाजीपाला विक्रीला केवळ गाड्यावरच परवानगी दिली. एका ठिकाणी बसून भाजीपाला, दूध विक्री करण्यास बंदी असल्याने या वेळी शहरातील कोणत्याही रस्त्यावर हातगाडे दिसले नाहीत. जिल्ह्याच्या इतर भागातही संचारबंदी लागू असल्याने या वेळी जिल्हा ठप्प झाल्याचे चित्र आहे.

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढले आहे. रोज २५-३० रुग्ण पाॅझिटिव्ह निघत आहेत. त्यामुळे प्रशासनाने लाॅकडाऊन करावे, अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पर्यंत संचारबंदी लागू केली. या काळात कोरोनाचा प्रभाव कमी होतो का याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.