आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील पाणी प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यासाठी गेलेले भाजप जिल्हाध्यक्ष संजय केनेकरसह 3 माजी महापौर व नगरसेवक पदाधिकाऱ्यांना संध्याकाळी पोलिसांना ताब्यात घेत छावणी पोलिस ठाण्यात नेले. राज्य शासनाची लोकशाही नाही दडपशाही आहे. त्याचे उत्तर मनपा निवडणूकीत शहरावासीय देतील, अशी प्रतिक्रीया माजी महापौर राजू शिंदे यांनी दिली.
शहरात पाण्याची भीषण समस्या असल्याने ती सोडवण्यात यावी, या मागणीसाठी भाजपचे शिष्टमंडळ संध्याकाळी 5 वाजता रामा हॉटेल जवळ गेले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत छावणी पोलिस ठाण्यात नेले होते. सकाळपासून भाजपच्या नेत्यांना आपल्याला नजर कैदेत ठेवल्याचे तसेच आपल्यावर पोलिस पाळत ठेवत असल्याचे आरोप केले होते. या घटनांच्या सत्राला संध्याकाळी वेगळे वळण आले.
भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यासाठी पहिले विमानतळावर येण्यास सांगण्यात आले. त्यानंतर राम हॉटेलवर येण्यास सांगितले होते. त्यामुळे शहराध्यक्ष संजय केनेकर, माजी उपमहापौर राजू शिंंदे, बापू घडामोडे, सुहास दाशरथे, साधना सुरडकर, माजी नगरसेवक शिवाजी दांडगे, रामेश्वर भादवे, सिद्धार्थ साळवे, अमृता पालोदकर, सविता कुलकर्णी आदी रामा हॉटेल जवळ पोहोचले होते. त्यावेळी पोलिसांना त्यांना ताब्यात घेवून छावणी पोलिस ठाण्यात नेले.
या घटनेचा निषेध करत भापजचे माजी उपमहापौर राजू शिंदे म्हणाले की, शिवसेना म्हणते आम्ही कोणाचा धसका घेत नाही. मग आमच्या वरील कारवाई काय आहे ? याचे उत्तर त्यांनी द्यावे. शिवसेनेला स्वाभिमान कोणाचा काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सत्ता बनवण्याचा की शहराला 8 दिवस पाणी मिळत नाही याचा स्वाभिमान आहे. त्याचा उत्तर शिवसेनेने द्यावे.
80 वर्षीय आजीबाईंनाही घेतले ताब्यात
पाणीप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यासाठी विष्णूनगर येथील रहिवासी 80 वर्षीय जनाबाई मोहिते या सुद्धा गेल्या होत्या. त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्यांना छावणी पोलिस ठाण्यात नेले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.