आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:शिवाराला वेढा देऊन पोलिसांनी तीन चोरट्यांना केले जेरबंद, महिलेच्या गळ्यातील दागिने ओढून पळाले होते चोरटे

हिंगोली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली तालुक्यातील बासंबा शिवारात मंगळवारी ता. ३० दुपारी एका महिलेच्या गळ्यातील दागिने पळविणाऱ्या तीघांना पोलिसांनी बासंबा शिवाराला वेढा देऊन अवघ्या दोन तासात जेरबंद केले आहे. या प्रकरणी त्या महिलेच्या तक्रारीवरून तिघांवर बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील शारदाबाई विट्ठल जाधव व त्यांचा मुलगा गोपाल जाधव हे त्यांच्या दुचाकी वाहनावर आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हिंगोलीकडून सिरसम येथे जात होते. यावेळी बासंबा शिवारात तिघांनी दुचाकी चालविणाऱ्या गोपाल यास दगड मारले. त्यानंतर शारदाबाई यांच्या गळ्यातील ७० ते ८० हजार रुपये किंमतीचे दागिने व एक मोबाईल घेऊन चोरट्यांनी पळ काढला. सदर प्रकार पोलिसांना कळाल्यानंतर पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, शिवसांब घेवारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, उपनिरीक्षक सुरेेश भोसले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मगन पवार यांच्या पथकाने घटनास्थळाच्या परिसराला वेढा दिला. त्यानंतर दोन तासांच्या तपासानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये बासंबा येथील आत्माराम कोठुळे, त्रिंबक पवार व अन्य एकाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी शारदाबाई जाधव यांच्या तक्रारीवरून बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...