आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानासाठी प्रकटली 'मयत' व्यक्ती!:बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या दोन महिला व एक पुरुष पोलिसांच्या ताब्यात

वाळूजमहानगर (संतोष उगले)7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या तिघांना पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ ताब्यात घेतले

वाळूज औद्योगिक परिसराला लागून असणाऱ्या पंढरपूर येथील ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये चक्क मयत व्यक्तीच मतदान करण्यासाठी आल्याचा प्रकार घडला. पंढरपूर येथील जुन्या जिल्हा परिषद शाळेत वर्ड क्रमांक १,२ व ३ साठी मतदान प्रक्रिया सुरू असताना मयत भास्कर जयाजी ढोले (६२) यांच्या नावाने त्यांच्याच वयाची व्यक्ती व अन्य दोन महिला बोगस मतदान करण्यासाठी आल्याचा प्रकार निवडणूकीत उमेदवार असणारे कुणाल खराटे,उमेदवार महिलेचा मुलगा प्रवीण चंदन यांच्यासह बूथवरील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला.

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. यासंदर्भात निवडणूक प्रक्रिया अधिकारी पोलिसांत तक्रार दाखल करणार असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे दिव्य मराठीशी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अधिक चौकशी केल्यानंतर, मयत व्यक्तीच्या जागी मतदान करण्यासाठी त्यांच्या नावावर दुसरीच व्यक्ती बोगस मतदान कार्ड घेऊन आल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान त्याच व्यक्तीसोबत आलेल्या अन्य दोन महिलासुद्धा बोगस मतदान कार्ड घेऊन मतदान करण्यासाठी आल्याचे निष्पन्न होताच स्वतः पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतबोगस मतदान कार्ड व मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तींना ताब्यात घेतले.

प्रशासनाचे हात वर
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना खऱ्याखुऱ्या मतदान कार्डा सारखेच बोगस कार्ड कोणी व कुठून बनवून दिले, त्यांना कोणी पाठवले, आणखी किती बोगत मतदार पाठवले आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी संबंधितांवर गुन्हा दाखल होणे गरचे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित बुथचे केंद्र अधिकारी, झोनल ऑफिसर यांनी पुढे येऊन तक्रार दिली तर पुढील कारवाई करता येईल असे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...