सिरसाळ्यात गस्तीदरम्यान पोलिसांवर लाकूड, दगडाने हल्ला; चार जण अटकेत

  • कर्फ्यूदरम्यान नागरिक टोळीने फिरत आहेत

प्रतिनिधी

Mar 25,2020 09:24:42 PM IST

सिरसाळा- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी करण्यात आला असून बुधवारी दुपारी परळी तालुक्यातील सिरसाळा येथे गस्तीवरील पोलिसांवर युवकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.

संचारबंदी दरम्यान लोकांना घरात बसण्याचे आवाहन सातत्याने पोलिस करत आहेत. परंतू लोक दुर्लक्ष करत आहेत. येथील वडार कॉलनी येथे गस्तीदरम्यान पोलिसांना काही नागरिक घरासमोर रस्त्यावर जमल्याचे दिसल्याने पोलिसांनी त्यांना संचारबंदी चालू असल्याने घरात जाण्याचे सांगितले. तेव्हा नागरिकांनी आमच्या गल्लीत येऊन सांगण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे असे म्हणत तेथील युवकांनी लाकूड, दगडाने पोलिस नाईक किशोर घटमल यांना मारहाण केली.

दरम्यान त्यांच्या तक्रारीवरून येथील राम तुकाराम पवार,श्रीराम पवार,दत्ता देवकर,अशोक पवार,विकास मिटकर,विलास मिटकर,सोनाली पवार,अनिल जाधव यांच्याविरोधात सिरसाळा पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम ५१(ब) व भारतीय दंड विधानच्या विविध कलमान्वये रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक जनक पुरी करत आहेत.दरम्यान,घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाल्याचे पहायला मिळाले.

X