आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडक कारवाई:नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यास 10 जूनपर्यंत पोलिस कोठडी, उस्मानपुरा पोलिसांनी केली होती अटक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद नशेच्‍या गोळ्यांची विक्री करण्‍यासाठी जाणाऱ्या तरुणाला उस्‍मानपुरा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्‍याच्‍याकडून नशेच्‍या 1740 गोळ्या, 1500 रोख रक्कम आणि मोबाइल असा सुमारे 13 हजार 680 रुपयांचा ऐवज हस्‍तगत करण्‍यात आला.

अजहर साबेर शेख असे आरोपीचे नाव असून त्‍याला 10 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी आर.व्‍ही. सपाटे यांनी रविवार (5 जून ) रोजी दिले.

उस्‍मानपुरा पोलिस ठाण्‍याच्‍या निरीक्षक गिता बागवडे या कर्तव्‍यावर असतांना 4 जून रोजी रात्री साडेनऊ वाजेच्‍या सुमारास एक व्‍यक्ती उस्‍मानपुरा परिसरातील देशी दारुच्‍या दुकानासमोरुन एसएससी बोर्डाकडे जाणाऱ्या रोडवर नशेच्‍या गोळ्यांची विक्री करण्‍यासाठी येणार असल्याची माहिती त्‍यांना मिळाली. त्‍यानूसार त्‍यांनी विशेष पथकाला कारवाई संबंधी निर्देश दिले. त्‍यानूसार विशेष पथकाचे उपनिरीक्षक वाघ व त्‍यांच्‍या पथकाने सापळा रचून अवैधरित्‍या नशेच्‍या गोळ्या घेवून जाणाऱ्या अजहर साबेर याला अटक केली. त्‍याच्‍याकडून नशेच्‍या गोळ्यांसह रोख रक्कम आणि मोबाइल असा सुमारे 13 हजार 680 रुपयांचा ऐवज जप्‍त करण्‍याता आला. प्रकरणात पोलिस नाईक योगेश गुप्‍ता यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उस्‍मानपुरा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. तपसादरम्यान आरोपीने नशेच्‍या गोळ्या हैदराबाद येथून मागविल्याची कबुली दिली.

आरोपीला न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी आरोपीला हैदराबाद येथून नशेच्‍या गोळ्या मा‍गविल्याचे सांगत असल्याने हैदरबाद येथे जावून तपास करायचा आहे. आरोपी गोळ्या कोणाला विक्री करणार होता, या मागे मोठी टोळी सक्रिय आहे काय, आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहे काय याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...