आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:हिंगोली पोलिस मुख्यालयात कर्मचाऱ्याची गोळीझाडून आत्महत्या,आत्महत्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात

हिंगोली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील पोलिस मुख्यालायतील आरमोरर विभागत कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःला गोळी मारून घेत आत्महत्या केली आहे. शनिवारी (ता. २०) दुपारी हा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

याबाबत अधिक माहित अशी की, येथील पोलिस  मुख्यालयातील आरमोरर विभागात (शस्त्र दुरुस्ती) जितेंद्र साळी (४३) हे कर्मचारी मागील काही दिवसांपासून कार्यरत होते. आज दुपारच्या सुमारास ते विभागात कामासाठी आले होते. त्यानंतर दुपारी त्यांनी कार्यालयातच एसएलआर रायफलने हनुुवटीच्या खालच्या भागातून गोळी मारून आत्महत्या केली. मुख्यालयातून गोळी उडाल्याचा मोठा आवाज आल्यानंतर तेथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी साळी यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचा चेहऱ्याचा भाग छिन्न विछिन्न अवस्थेत असल्याचे दिसून आले.

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलिस अधिक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, उपाधिक्षक रामेश्‍वर वैंजने, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक जगदीश भंडारवार यांनी घटनास्थळी घेतली. घटनास्थळावर पंचनामा सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती त्याच्या कुटुंंबियांनाही देण्यात आली आहे.

दरम्यान, मयत जितेंद्र साळी हे मुळचे कळमनुरी येथील रहिवासी आहेत. सन २००१ मध्ये हिंगोली पोलिस दलात भरती झाले होते. त्यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात काम केले आहे. त्यानंतर त्यांनी अरमोरर विभागात काम सुरु केले होते. त्यांच्या पश्‍च्यात पत्नी, दोन मुले असा परिवार असल्याचे सांगण्यात आले आहे.

शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद ः योगेशकुमार, पोलिस अधिक्षक

या प्रकरणात शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यांच्या आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नसले तरी कौटूंबिक वादातून त्यांनी हा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. मात्र या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर अात्महत्येचे नेमके कारण समजू शकणार आहे.

बातम्या आणखी आहेत...