आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:पतीने भावाच्या मदतीने पत्नीचा गळा आवळून केला खून, रुग्णालयात फिटस्‌ आल्याचा रचला होता बनाव; पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील तिरुपती नगरात विवाहितेचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीसह दिरा विरुध्द हिंगोली शहर पोलिस ठाण्यात रविवारी ता. २४ पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. उत्तरीय तपासणीच्या प्राथमिक अहवालामध्ये गळ्याच्या भोवती काही खुना आढळून आल्या तर मारहाणीचे व्रण देखील आढळून आल्याने हा गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील तिरुपतीनगरातील किरण पंकज सावंत (२१) यांचा विवाह सात महिन्यापुर्वीच झाला होता. पंकज सावंत हा औंढा नागनाथ तालुक्यातील पुर येथील रहिवासी असून तो त्याच्या तीन भावासोबत हिंगोलीत राहतो. ता. १८ जानेवारी रोजी सकाळी साडेआठ ते पावने नऊ वाजण्याच्या सुमारास किरण सावंत यांना फिटस्‌ आल्याचे सांगत त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. उत्तरीय तपासणीच्या प्राथमिक अहवालानुसार किरण सावंत यांच्या अंगावर मारहाणीचे व्रण होते या शिवाय गळ्या भोवती त्यांच्या गळ्या भोवती कोणत्यातरी साहित्याने त्यांचा आवळल्याच्या खूना होत्या. त्यानंतर सदर प्राथमिक अहवालावरून पोलिस निरीक्षक सरदारसिंह ठाकुर यांनी तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी पंकज बाबाराव सावंत, गोपाल बाबाराव सावंत (रा. पुर, ता. औंढा) या दोघां विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक ठाकुर, उपनिरीक्षक नितीन केणेकर पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी वरील दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...