आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतील सभा प्रकरण:राज ठाकरे यांना पोलिसांची नोटीस, चिथावणीखोर भाषणप्रकरणी औरंगाबादेत गुन्हा दाखल

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रदिनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या चिथावणीखोर भाषणप्रकरणी औरंगाबादेत मे महिन्यात गुन्हा दाखल केला होता. सिटी चौक पोलिसांनी याप्रकरणी तपास पूर्ण करत त्यांच्या ५० मिनिटांच्या भाषणांतील चौदा चिथावणीखोर वक्तव्यांप्रकरणी सबळ पुरावे गोळा करुन दोषारोपपत्र तयार केले. ते दाखल होताच कोर्टाने आदेश दिल्यानंतर योग्य जामीनदारासह हजर राहा, अशी नोटीस राज यांच्यासह कार्यक्रमाचे अर्जदार राजीव जावळीकर यांना स्पीडपोस्टद्वारे पाठवली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांंच्याकडे तपास देण्यात आला होता. यामध्ये पोलिसांचे अधिकृत व्हिडिओग्राफर, विविध वृत्तपत्रांचे वृत्तांकन व साक्षीदारांचे जबाबावरून विश्लेषण करण्यात आले. त्यावरून दोषारोपपत्र तयार करण्यात आले.फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम ४१ (अ) (१) अन्वये ही नोटीस पाठवण्यात येते. तुमच्या विरोधात सबळ पुरावे असून दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हजर राहावे, असे त्यात सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...