हिंगोलीत जमादारासह त्यांच्या मुलीस पोलिस अधिकाऱ्याची मारहाण, औषधी घेऊन घरी जात असताना घडला प्रकार

  • मारहाणीत जखमी झाल्यानंतर अपघात झाल्याचे सांगितले

प्रतिनिधी

Mar 25,2020 08:03:18 PM IST

हिंगोली- शहरातील नांदेड नाका येथे कर्तव्य बजावून औषधी घेऊन घरी जाणाऱ्या जमादारासह त्याच्या मुलीस पोलिस अधिकाऱ्याने बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यामुलीस डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला उपचारासाठी हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हिंगोली जिल्हयातील कनेरगावनाका येथील चौकीमध्ये कर्तव्यावर असलेले जमादार साहेबराव राठोड हे आज सकाळी मधुमेहाच्या गोळ्या घेण्यासाठी हिंगोलीत आले होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत हिंगोली शहरातील मस्तानशहा नगरात त्यांची मुलगी प्रियंका राठोड यांनी सर्वेक्षणाचे काम केले. यावेळी तिने जमादार राठोड यांना दुरध्वनीकरून घरी घेऊन जाण्यासाठी या असा दुरध्वनी केला. त्यानुसार जमादार राठोड त्यांची मुलगी प्रियंका हिस घेऊन घरी निघाले होते. यावेळी नांदेडनाका भागात एका पोलिस अधिकाऱ्याने जमादार राठोड व प्रियंका राठोड यांना बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. राठोड यांनी मी पोलिस कर्मचारी असल्याचे सांगितल्यानंतरही त्यांना मारहाण सुरुच ठेवली त्यामुळे ते बाजुला पळून केले. तर अधिकाऱ्यांनी प्रियंका यांनाही मारहाण केली. या मारहाणीत तिच्या डोक्याला काठी लागल्याने ती बेशुध्द झाली. त्यानंतर तेथे असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिच्या डोक्यावर पाच टाके पडले आहेत. त्यानंतर तिला उपचारासाठी शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात आता वरिष्ठ अधिकारी काय भुमीका घेतात याकडे पोलिस खात्याचेच लक्ष लागले आहे.

मारहाणीत जखमी झाल्यानंतर अपघात झाल्याचे सांगितले

या मारहाणीत प्रियंका गंभीर जखमी झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास दुरध्वनीकरून तुमच्या कर्मचाऱ्याचा अपघात झाल्याचे सांगितल्याचा आरोप जमादार राठोड यांनी केला आहे.

X