आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबादेतील दुकान बंद करुन दुचाकीवर घराकडे निघालेल्या सोनाराला रस्तात अडवून मारहाण करत त्याच्या जवळील 1 लाख 45 हजारांचे दागिने ठेवलेली बॅग लंपास केल्याप्रकरणी हर्सुल पोलिसांनी संशयिताला अटक केली.
प्राप्त माहितीनुसाल, विकास ऊर्फ विक्की जनार्धन भडके (19, रा. सावता कॉलनी, पडेगाव) याला अटक केली. त्याला 20 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.व्ही. सपाटे यांनी दिले.
प्रकरणात जटवाडा रोडवरील सारावैभव परिसरात राहणारे शैलेश एकनाथराव टाक (23) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, फिर्यादीचे काटशेवरी फाटा (ता. खुलताबाद) येथे कार्तिकी ज्वेलर्सचे दुकान आहे. 22 फेब्रुवारी रोजी फिर्यादी हे दुकान बंद करुन दुचाकीवर घराकडे परतत असताना चौघांनी फिर्यादीला मारहाण करुन त्यांच्याकडील दागिन्याची बॅग हिसकावून घेत धूम ठोकली. प्रकरणात हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात नितीन सदाशिव डांगे (29), सुनील मुरलीधर मगर ऊर्फ सोनू (25, दोघे रा. गणेशनगर, गारखेडा परिसर), रविंद्र ऊर्फ हरि संजय जाधव (21,रा.जयभवानीनगर), नितीन कल्याण ससाणे (रा.बंबाटनगर) यांना पोलिसांनी अटक केली होती.
ऐवज जप्त
दरम्यान आरोपी विकास ऊर्फ विक्की भडके याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील सय्यद शहनाज यांनी आरेापीकडून गुन्ह्यातील उर्वरित ऐवज जप्त करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याची विनंती न्यायालायकडे केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.