आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:कत्तलखान्यात जाणाऱ्या 18 बैलांची हट्टा पोलिसांनी केली सुटका, चौघांवर गुन्हा दाखल

हिंगोली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी पाटीजवळ हट्टा पोलिसांनी एका ट्रकच्या केलेल्या तपासणीमध्ये १८ बैल निर्दयपणे कोंबलेले  आढळून आले. पोलिसांनी बैलांची सुटका केली असून या प्रकरणी चौघांवर हट्टा पोलिस ठाण्यात गुरूवारी (ता. २३) गुन्हा दाखल झाला आहे. 

 नांदेड ते जवळा बाजार मार्गावर नागेशवाडी पाटीजवळ हट्टा पोलिसांच्या पथकाने आज पहाटे चार वाजल्या पासून अचानक वाहनांची तपासणी सुरू केली होती. सहाय्यक  पोलीस निरीक्षक गजानन मोरे, जमादार बालाजी जाधव, राठोड यांच्या पथकाकडून तपासणी सुरू करण्यात आली. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी एक ट्रक (क्र. एमएच - ४०- बीएल- ४५१९ ) थांबवला. पोलिसांनी चालकाकडे चौकशी सुरू केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी ट्रकची तपासणी केली. यामध्ये ट्रक मध्ये १८ बैल निर्दयतेने कोंबून ठेवलेल्या स्थितीत आढळून आले.

 पोलिसांनी सदर ट्रक जप्त करून हट्टा पोलीस ठाण्यात आणला.  या जनावरांच्या विक्रीचे दाखले मागितले असता ट्रकचालकाला दाखलेही दाखवता आली नाही. त्यामुळे सदरील बैल अवैधरित्या कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी बैलांची सुटका केली.  

या प्रकरणी जमादार बालाजी जाधव यांनी हट्टा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी शफी मिया (रा.परभणी), गफार इब्राहीम खान पठाण, चालक शेख इम्रान शेख अहमद, क्लिनर सय्यद अबूझर सय्यद मजहर (सर्व.रा.नांदेड) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

Advertisement
0