आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:आता सर्व संपलं असे सांगत फेसबुक लाईव्ह वरून मित्राची माफी मागणाऱ्या तरुणाला पोलिसांच्या सतर्कतेने वाचविण्यात यश

हिंगोली5 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

मित्रांनो आता सर्व संपले आहे मला माफ करा अशा शब्दात फेसबुक लाईव्ह वरून मित्राशी संवाद साधत नैराश्यामुळे आत्महत्येचा निर्णय घेणाऱ्या शिंदेफळ ( ता. सेनगांव ) येथील तरुणाला पत्रकार मित्र व पोलिस अधिकाऱ्यांनी वाचविले. अवघ्या पंधरा मिनिटात मोबाईल लोकेशन वरून त्याचा शोध घेत त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ येथील संतोष वाठोरे (३५ )यांचे चहाचे छोटे दुकान आहे. घरी आई, वडील पत्नी व मुले असा परिवार आहे. मागील काही दिवसात कोरोनामुळे चहाचे दुकानही बंद होते. या परिस्थितीत उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. घरी थोडीफार शेती आहे मात्र पिकांचेही पावसामुळे नुकसान झाले. यामुळे मागील तीन ते चार दिवसापासून ते नैराश्यामध्ये होते.

दरम्यान आज सकाळी त्यांनी फेसबुक लाईव्ह वरून मित्रांना, आता सर्व संपले आहे, मला माफ करा असे सांगितले. हा प्रकार पत्रकार मनीष खरात यांनी बघितल्यानंतर त्यांनी तातडीने संतोष वाठोरे यांच्याशी संपर्क साधला. मात्र यावेळी संतोष यांनी थोड्यावेळातच कळेल असे सांगत दूरध्वनी कट केला. काहीतरी अघटीत घडेल या भितीने पत्रकार मनिष खरात यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर घेवारे यांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने संतोष वाठोरे यांचे मोबाईल लोकेशन बघितले. तो शिंदेफळ शिवारात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे मित्र व नातेवाईकांना माहिती देऊन संतोषकडे धाव घेण्यास सांगितले. त्यानंतर घेवारे यांच्या मित्रांनी शिंदेफळ शिवारात जाऊन संतोष यास ताब्यात घेतले व त्यांच्या नातेवाईकांच्या हवाली केले.

सामाजिक कार्यकत्यांनी केले मत परिवर्तन

औंढा नागनाथ येथील सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांनी तातडीने संतोष वाठोरे यांच्याशी दुरध्वनी वरून संपर्क साधला. कुठलेही टोकाचे पाऊल उचलू नका, आम्ही सर्व तुमच्या पाठिशी आहोत असे सांगितले. त्यानंतर वाठोरे यांनी टोकाचे पाऊल उचलणार नाही असे आश्वासन दिले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser