आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Aurangabad Auto Driver And Young Girl Speech | Auranagabad Auto Viral Video | Police Still Alert After 'that' Incident In Aurangabad; But Fear Remains Among The Students!

मुलींनो सुरक्षित वाटत नसेल, तर 112 डायल करा:औरंगाबादच्या 'त्या' घटनेनंतर पोलिस अजून दक्ष; पण विद्यार्थिनींमध्ये भीती कायम!

हर्षदा हरसोळे । औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमध्ये रिक्षाचालकाने अश्लील संभाषण केल्यामुळे घाबरलेल्या एका विद्यार्थिनीने रविवारी रिक्षातून उडी मारल्याच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली. या घटनेमुळे मुलींसाठी खरेच रिक्षाचा प्रवास सुरक्षित आहे का, तरुणी सुरक्षित आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात आम्हाला रिक्षा प्रवास करताना सुरक्षित वाटत नसल्याची भावना या मुलींनी व्यक्त केलीय.

भीती वाटत असेल. तुम्ही कुठेही आणि केव्हाही असा. फक्त 112 क्रमांक डायल करा. आम्ही तिथे पोहचू, असा दिलासा पोलिसांनी दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना दिलाय.

आरशातून मुलींवर वाईट नजर

औरंगाबादमध्ये घडलेली घटना निंदनी आहे. रिक्षाचालक सर्रासपणे चुकीचा स्पर्श करतात. अर्वाच्य, अश्लील बोलतात. विशेषतः रिक्षाचालकांच्या डोक्यासमोर जो आरसा आहे त्याचा वापर फक्त आणि फक्त मागे बसलेल्या पॅसेंजरला वाईट नजरेने बघण्यासाठी लावलेला असतो. त्यावर आधी कारवाई करायला हवी असे मला वाटते. सोबतच अशा घटनांवर योग्य तो न्याय मिळायला हवा आणि महिला सक्षमीकरण होणेही तितकेच गरजेचे आहे.

- राखी तांबट, विद्यार्थिनी

मुलींची असुरक्षिता गंभीर

मुलींमध्ये दिवसेंदिवस वाढत जाणारी असुरक्षितता आणि भीती ही गंभीर बाब आहे. विकृत मानसिकतेच्या लोकांना कायद्याचीही भीती राहिली नाही ही शोकांतिकाच आहे. आरोपीस शिक्षा होईलच. मात्र, हा समस्येवरचा एकमात्र उपाय नाही. मुलींना स्व-सुरक्षेचे (self defense) प्रशिक्षण दिले पाहिजे. घाबरून न जाता सजग राहून हजरजबाबीपणा दाखवता यावा त्यासाठी महिलांना हेल्पलाइन क्रमांकाची माहिती हवी.

- साक्षी पवार, विद्यार्थिनी

घाबरण्यापेक्षा दोन हात करा

प्रत्येक वेळेला आई-वडील मुलींना सोडायला घ्यायला जाऊ शकत नाही. औरंगाबादमधील घटनेने मुलींमध्ये भीती निर्माण झाली आहे. एका रिक्षाचालकाने त्या मुलीशी केलेली वागणूक अतिशय निंदनीय आहे. औरंगाबाद शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. उद्या उठून असा काही प्रसंग आल्यास मुलींनी न घाबरता घटनेला सामोर जाणं गरजेचे आहे.

- वैष्णवी बिडवे, विद्यार्थीनी

संरक्षणाचे धडे द्यावे

खरेतर निश्चितच ही घटना अतिशय निंदनीय आहे. याच सारखी घटना वर्षभरापूर्वी औरंगाबादमध्ये घडली होती. औरंगाबाद असो की कोणतेही शहर, अथवा गाव मुली आजही सुरक्षित नाहीतच. औरंगाबाद शहरात दामिनी पथक व पोलिस 24 तास नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्नशील असतात, पण आता तेवढ्याने भागायचे नाही. यासाठी प्रत्येकाने काम करणे गरजेचे आहे. प्रत्येक मुलीला संरक्षणाचे धडे तसेच, असा प्रसंग उद्भवल्यास त्याला शांत डोक्याने कसे सामोरे जायचे याबद्दल सशक्त मानसिकता तयार करण्याची गरज आहे.

-प्राची नाईक, विद्यार्थिनी

ट्रॅफिक पोलिसांनी लक्ष द्यावे

मुलींच्या सुरक्षिततेची काळजी ही केवळ पोलिसांची नसून, ट्रॅफिक पोलिसांची देखील आहे. रिक्षाचालक कशी रिक्षा चालवत आहेत. याकडे ट्रॅफिक पोलिसांनी देखील लक्ष घालणे गरजेचे आहे. आज ट्रॅफिक पोलिस तिथे असते, तर त्या मुलीसोबत जो प्रकार घडला तो झाला नसता. अशा अनेक प्रकारच्या घटना आमच्याकडे येतात. पण मुलींनी स्वत:च संरक्षण स्वत: करण्यासाठी 112 या हेल्पलाइनची सुविधा करून देण्यात आली आहे. ही सेवा स्त्रीयांसाठी - मुलींसाठी 24/7 उपलब्ध आहे. या मुलीने पोलिसांत तक्रार दिली हे खरच चांगले झाले. पोलिसांनी असे आवाहन केले आहे की, असा काही प्रसंग घडल्यास मुलींनी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता त्यांनी पोलिसांत तक्रार दिली पाहिजे.

- डी.सी.पी. उज्ज्वला वणकर, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...