आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

परभणी:अधिकाऱ्यांवर आरोप करत पोलिस कर्मचाऱ्याने घेतले विष, परभणीतील प्रकार

परभणीएका महिन्यापूर्वीलेखक: प्रविण देशपांडे
  • कॉपी लिंक

पोलिस दलात असलेल्या सख्या मोठ्या भावावर पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून अन्याय झाल्याचा आरोप करत एका पोलिस हवालदाराने शहरातील जलतर्णीका कॉम्प्लेक्ससमोर सोमवारी (दि.5) दुपारी दीडच्या सुमारास विषारी औषध पिले. या प्रकाराने एकच खळबळ उडाली होती. बालाजी लिंबाजीराव कच्छवे असे या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

महामार्गाचे पोलिस कर्मचारी बालाजी कच्छवे हे सोमवारी दुपारी जलतर्णीका कॉम्प्लेक्स परिसरात आले. माझ्या भावावर पोलिस खात्यात अन्याय झाला आहे. भावाविरूध्द कुठलाही पुरावा नसताना एकतर्फी निर्णय घेत त्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बडतर्फ केले आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्य चिंतेत आहेत, असे म्हणत त्यांनी सोबत आणलेले औषध प्राषण केले.

अचानक झालेल्या या प्रकाराने परिसरातील नागरिक तातडीने त्यांच्याकडे धावले. मात्र, तोपर्यंत ते खाली कोसळले होते. त्यांना तातडीने उपचारार्थ दवाखान्यात नेण्यात आले. नागरिकांनी तातडीने ही बाब नवामोंढा पोलिसांना सांगितली. पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू मुत्तेपोड, फौजदार अभिजीत वाघमारे, कर्मचारी रवीकुमार जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.