आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:पोलिसांचे वाहन उलटून दोघे जण जखमी, उपचारासाठी आखाडा बाळापूर येथे दाखल

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आखाडा बाळापूर ते वारंगाफाटा मार्गावर आडापाटी जवळ वीट वाहतूक करणाऱ्या ट्रकचे स्टेअरींग रॉड तुटल्याने ट्रक पोलिस वाहनावर येत असल्याने चालकाने प्रसंगावधान राखून वाहून रस्त्याच्या खाली घेतले. मात्र या प्रयत्नात वाहन उलटून दोघे जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी ता. २१ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथे गुरुवारी ता. २० रात्री हाणामारीची घटना घडली होती.या प्रकरणात एकाचा गळा चिरल्याने त्या व्यक्तीस उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. त्यानंतर आज आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर, उपनिरीक्षक हनुमंत नकाते यांच्यासह हिंगोलीचे एक पथक देखील भाटेगाव येथे गेले होते.

त्या ठिकाणी पंचनामा व इतर कामे आटोपून सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर, छायाचित्रकार दिगंबर शिंदे, चालक प्रकाश कांबळे व अन्य एक जण आखाडा बाळापूरकडे निघाले. पोलिसांचे वाहन आडा पाटी जवळ आले असतांना समोरून वीट वाहतूक करणाऱ्या ट्रकचे स्टेअरींग रॉड तुटले. त्यामुळे वाहन चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले. ट्रक पोलिस वाहनावर येत असल्याचे दिसताच चालक कांबळे यांनी पोलिस वाहन रस्त्याच्या खाली उतरवले. मात्र ट्रकचा धक्का लागल्याने पोलिस वाहन उटलले. या अपघातात हुंडेकर यांच्या पायाला दुखापत झाली तर छायाचित्रकार शिंदे जखमी झाले.

यावेळी पाठीमागून वाहनाने येणाऱ्या ग्रामसेवक रुद्राजी क्षिरसागर, पोटे, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ छत्रे, ग्रामपंचायत कर्मचारी शेख हारूण यांनी त्यांचे वाहन थांबवून पोलिस वाहनातील सर्वांना बाहेर काढले. जखमी झालेल्या शिंदे यांना उपचारासाठी आखाडा बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातानंतर ट्रक चालक मात्र फरार झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...