आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपमध्ये मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली की त्याचा राजकीय एन्काऊंटर केला जातो. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांचे हेच झाले. मात्र भाजपाने इतर उमेदवारांना तिकीट देण्याऐवजी पंकजा मुंडे या चांगल्या उमेदवार असल्याचे सांगत विधान परिषदचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भाजपला चिमटा काढला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेची तयारी पूर्ण झाली असून त्याला मोठा प्रतिसाद मिळणार असल्याचा दावा त्यांनी रविवारी औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत केला आहे.
यावेळी गोऱ्हे यांनी औरंगाबादला ठाकरे सरकारच्या काळात कसा निधी दिला आहे, त्याचा पाढा वाचवून दाखवला. यावेळी विनोद घोसाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, अशोक पटवर्धन, रेणूकदास वैद्य यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांना ऐकायला लोक येणार
नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मराठवाडा आणि औरंगाबादने कायम शिवसेनेवर प्रेम केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलतात हे लोकांना ऐकायचे आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण विषय असो अथवा अनेक विषयवार मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. तसेच औरंगाबाद नामकरण बाबतच्या प्रस्तावबाबत भाजपची ती जुनीच सवय असल्याचे सांगत मराठी भाषेच्या बाबतीतही सातत्याने प्रस्ताव पाठवून त्यामध्ये दोष दाखवत प्रस्ताव परत पाठवल्याचे त्यांनी सांगितले.
ती त्यांची जुनीच सवय असल्याचे सांगत त्यांनी भाजपला टोला लगावला. तसेच राज्यसभेत भाजपने कितीही ताकद लावली तरी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.