आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामिटमिटा येथील तीस वर्षांपूर्वी विकलेल्या सहा एकर जमीन भुखंडमाफियाने बळकावयाचा प्रयत्न केला. मूळ मालकांनी आक्षेप नोंदवल्यानंतर ताबा सोडण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांची खंडणी मागत न दिल्यास बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. मूळ मालकांनी थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर अंबादास आसाराम म्हस्के, किशन कणसेसह नऊ जणांवर छावणी पोलिस ठाण्यात १३ कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
नसीर रशीद पठाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पडेगावमधील २ हेक्टर ६१ आर जमीन १९९० मध्ये आशा म्हस्के यांनी विठ्ठल गोराडे, पूर्णिमा कोल्हे, सुनीता सलगरे यांच्यासह एकूण सात जणांना विकली होती. २००६ मध्ये जयराम सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आठ सदस्यांनी रीतसर ही जमीन विकत घेतली. २७ जानेवारी रोजी जमिनीवर अचानक १५० लोकांचा जमाव जमला. त्यांनी तेथील अंकित लिंभोरे यांच्या हॉटेलची तोडफोड करून हाकलून लावले.
हा प्रकार नसीर पठाण यांना कळताच त्यांनी सहकारी महेश थट्टेवर यांना साेबत घेऊन तेथ गेले. तेव्हा मूळ मालक आशा यांचा वारसदार अंबादास म्हस्के तेथे होता. ही माझी वडिलोपार्जित जमीन असल्याचे सांगून त्यांच्यासोबत असलेल्यांनी त्यांना मारहाण करत हाकलून लावले. सर्व सदस्यांनी त्याला कागदपत्रे दाखवून समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने थेट जमिनीवर पत्र्याचे शेड उभारून जनावरे बांधली.
राजकारण्यांचे सहकार्य : म्हस्केवर आतापर्यंत जमिनी बळकावण्याचे १२ तर कणसेवर तीन गुन्हे दाखल आहेत. तरीही काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या पाठबळावर ते सर्रास असे प्रकार करतात, असे पोलिसांनी सांगितले.
एक एकर जमीन किंवा दीड कोटी रुपयांची मागितली खंडणी म्हस्केने ताबा सोडण्यासाठी एक एकर जमीन द्या, नसता दीड कोटी रुपये द्या, अन्यथा जमिनीचा ताबा मागितला तर बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल करेन, अशी धमकी दिली. त्यानंतर स्वत:च्या नावाने मीटर बसवत न्यायालयात खोटे पुरावे सादर केले. त्यामुळे सदस्यांनी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेट घेत तक्रार केली. त्यांच्या आदेशावरून गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक काशीनाथ महांडुळे यांनी तपास केला. त्यांच्या अहवालावरून छावणीचे निरीक्षक कैलास देशमाने यांनी म्हस्के, कणसे, इलियास पटेल, खंडू म्हस्के, नंदकुमार म्हस्के, चंद्रकला जाधव, जनाबाई पादर, शोभा प्रधान यांच्यावर गुन्हा दाखल केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.