आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा व विद्या परिषद निवडणुकीची संपूर्ण तयारी विद्यापीठ प्रशासनाने केली आहे. यात ४ जिल्ह्यांतील १७ मतदान केंद्रांवर ४,२०५ मतदार शनिवारी मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली.
विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद, अभ्यास मंडळ निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात पदवीधर गटातील दहा जागांसाठी निवडणूक झाली. त्याची मतमोजणीही झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील अधिसभेच्या २९, विद्या परिषदेच्या ८, तर ३८ अभ्यास मंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात आहे. सर्व जागांसाठी सकाळी ८ ते ५ दरम्यान मतदान होईल. बीड, औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी पाच, तर जालना जिल्ह्यात दोन मतदान केंद्रे आहेत. औरंगाबादेत नाट्यशास्त्र विभागात दोन बूथ असतील. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (सिल्लोड), शिवाजी महाविद्यालय (कन्नड), विनायकराव पाटील महाविद्यालय (वैजापूर) व प्रतिष्ठान महाविद्यालयात (पैठण) प्रत्येकी एक केंद्र असेल.
बीड येथे केएसके कॉलेज, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (अंबाजोगाई), भगवान कॉलेज (आष्टी), सिध्देश्वर महाविद्यालय (माजलगाव), बाबूराव आडसकर महाविद्यालयाला (केज) प्रत्येकी एक केंद्र असेल. उस्मानाबादेतील विद्यापीठाचे उपकेंद्र, तुळजाभवानी कॉलेज (तुळजापूर), ज्ञानदेव मोहेकर कॉलेज (कळंब), आदर्श कॉलेज (उमरगा), रा. गो. शिंदे कॉलेज (परंडा) येथेही मतदान केंद्रे असतील. जालन्यात जेईएस कॉलेज, मॉडेल कॉलेज (घनसावंगी) अशा १७ केंद्रांचा समावेश आहे.प्रवर्गनिहाय उमेदवार, मतदार : निवडणुकीत अधिसभेच्या २५ व विद्या परिषदेच्या ६ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. दोन्ही गटात तीन जागा बिनविरोध आल्या असून तीन रिक्त राहिल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.