आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काेराेनामुळे प्रथमच सुविधा:मतदान केंद्र आपल्या दारी; गाेपनीयता पाळून पदवीधरसाठी ज्येष्ठांचे मतदान

औरंगाबाद / प्रवीण ब्रह्मपूरकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडकाे एन ३ भागातील ज्येष्ठ मतदार लक्ष्मण रायमाने यांनी प्रकृतीच्या कारणामुळे पलंगावर बसून मतदानाचा हक्क बजावला. - Divya Marathi
सिडकाे एन ३ भागातील ज्येष्ठ मतदार लक्ष्मण रायमाने यांनी प्रकृतीच्या कारणामुळे पलंगावर बसून मतदानाचा हक्क बजावला.
  • औरंगाबादेत 67 ज्येष्ठांनी घरुन बजावला मतदान हक्क

भारतीय लाेकशाहीत एकेका मतदानाचे किती महत्त्व आहे, ते करवून घेण्यासाठी निवडणूक आयाेगाची यंत्रणा किती शर्थीचे प्रयत्न करत आहे याची प्रचिती पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने आैरंगाबाद शहरात पुन्हा एकदा आली. ८० पेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ मतदारांच्या घरी जाऊन मतदान करवून घेण्याचे आदेश आयाेगाने दिले आहेत. त्यानुसार निवडणूक कर्मचाऱ्यांनी बुधवारी शहरातील ६७ मतदारांच्या घरी जाऊन ही प्रक्रिया पार पाडली. थेट मतदान केंद्रच आपल्या घरी आल्याने हे ज्येष्ठ मतदारही हरखून गेले हाेते. सर्व प्रक्रिया समजून घेत त्यांनीही तितक्याच उत्साहात मतदानाचा पवित्र हक्क बजावला. उर्वरित मतदारांचे २७ नाेव्हेंबर राेजी मतदान करवून घेतले जाणार आहे.

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर तीन नायब तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक विभागाचे हे कर्मचारी मतदारांच्या घरी जात आहेत. एका पथकात सुमारे १० कर्मचारी असतात. पथकप्रमुख मतदाराला सर्व प्रक्रिया समजावून सांगतात. मंगळवारी सिडकाे व गारखेडा परिसरात नायब तहसीलदार योगिता खटावकर, रेवनाथ ताठे आणि रतनसिंग साळोक या पथकप्रमुखांच्या नेतृत्वाखाली प्रदीप आखरे, दिनेश हापत, गजानन चिपडे, सकरूसिंग घुसिंगे, पी. एस.नलावडे यांनी ही प्रक्रिया पार पाडली.

निवडणूक विभागाचे काैतुक, युवकांना मतदान करण्याचा सल्ला
एसटी खात्यातील निवृत्त लेखाधिकारी, ८५ वर्षीय रंगराव भाकरे यांनीही मतदान केले. ते म्हणाले, ‘मी सातत्याने पदवीधरच्या निवडणुकीत मतदान करत आलो आहे. या वेळी कोरोनामुळे जाणे अवघड होते. मात्र प्रशानाने हा उपक्रम राबवून आम्हाला मतदानाचे कर्तव्य बजावण्याचा अधिकार दिला. युवकांनीदेखील मतदानाचे कर्तव्य बजावले पाहिजे. ८३ वर्षांच्या मुरलीधर पैठणे यांनी सांगितले की, ‘निवडणूक आयोगाचा हा उपक्रम खूपच चांगला आहे. त्यामुळे आम्हाला मतदान करणे शक्य झाले आहे. युवकांनीदेखील मतदान करणे गरजेचे आहे.’
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर तीन नायब तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक विभागाचे हे कर्मचारी मतदारांच्या घरी जात आहेत. एका पथकात सुमारे १० कर्मचारी असतात. पथकप्रमुख मतदाराला सर्व प्रक्रिया समजावून सांगतात. मंगळवारी सिडकाे व गारखेडा परिसरात नायब तहसीलदार योगिता खटावकर, रेवनाथ ताठे आणि रतनसिंग साळोक या पथकप्रमुखांच्या नेतृत्वाखाली प्रदीप आखरे, दिनेश हापत, गजानन चिपडे, सकरूसिंग घुसिंगे, पी. एस.नलावडे यांनी ही प्रक्रिया पार पाडली.

गाेपनीयता अन‌् चित्रीकरणही
मतदान केंद्रावर ज्याप्रमाणे गुप्तता पाळली जाते त्याच पद्धतीने या मोहिमेत मतदान गुप्त राहील याची खबरदारीही घेण्यात आली होती. मतदान केंद्रावर ज्याप्रमाणे आडाेसा निर्माण केलेला असताे तशीच साेय मतदारांच्या घरीही करून देण्यात आली. त्यामागे जाऊन मतदारांनी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमाेर प्राधान्यक्रम नाेंदवून मतदान केले. या प्रक्रियेत इतकी गाेपनीयता पाळण्यात आली की मतदाराच्या कुटुंबीयांनाही मतदान काेणाला झाले हे कळू शकले नाही. या मतदान प्रक्रियेचे प्रत्येक ठिकाणी चित्रीकरणही करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी अत्यंत दक्ष राहून मतदान प्रक्रिया पार पाडली होती.

तासभर थांब, विचार करून करताे मतदान
विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक डॉ. कमलाकर गंगावणे यांनीही या प्रक्रियेत मतदान केले. ते म्हणाले, ‘मी १९६५ ला पहिल्यांदा जिल्हा परिषदेत मतदान केले. त्यानंतर १९७१ पासून पदवीधरसाठी मतदान करत आहे. घटनेने हा आपल्याला अधिकार दिला आहे, त्याची अंमलबजावणी आपण केलीच पाहिजे, असे त्यांनी सांगितले. सुरुवातीला त्यांनी पथकाला ‘काेणाला मतदान करायचे याचा मला तासभर विचार करू द्या,’ असे सांगितले. त्यामुळे सारेच चक्रावले, मात्र पथकप्रमुखांनी तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, असे सांगितल्याने डाॅ. गंगावणेही सुखावले. नंतर अवघ्या दहा मिनिटातच त्यांनी प्रक्रिया पूर्ण केली. कोरोनाच्या काळात अशा पद्धतीने मतदान करून घेत असल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्याचे कौतुकही केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser