आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉलिटेक्निक प्रवेशाची लगबग:ब्रांचसह महाविद्यालयही निवडण्याची विद्यार्थ्यांना संधी, दुसऱ्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरुवात

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार पासून पॉलिटेक्निक प्रथम वर्ष अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या प्रवेश फेरीत सहभागी होण्यासाठी ऑप्शन फाॅर्म भरून घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यात विद्यार्थी त्यांच्या आवडीची ब्रांचआणि महाविद्यालय निवडू शकतील, अशी मुभा देण्यात आल्याची माहिती गर्व्हर्मेंट पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेतील समन्वयकांनी दिली.

मराठवाड्यातील 10 शासकीय व 47 खासगी पाॅलिटेक्निक काॅलेजच्या 15 हजार 40 जागा असून पहिल्या प्रवेशफेरीसाठीची प्रक्रिया बुधवार 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी पूर्ण झाली. 1 सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंटचा म्हणजे आपल्या पहिल्या फेरीतील जागा आरक्षित ठेवत दुसऱ्या फेरीत प्रवेशसाठी सहभाग नोंदण्यासाठी पर्याय निवडला होता. त्या विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

31 ऑगस्टपर्यंत मुदत

पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांच्या 21 हजार 634 अर्जांपैकी 17 हजार 470 विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरले. विद्यार्थ्यांना मिळालेले अलाॅटमेंट लाॅगीनमधून स्वीकारून प्रवेश निश्चितीसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर आता दुसऱ्या फेरीसाठीची प्रक्रिया ही सुरु करण्यात आली आहे.

बेटरमेंटचा पर्याय

तंत्रनिकेतन प्रथम व द्वितीय वर्षासाठी आवडीचे महाविद्यालय, आवडीची ब्रांच म्हणजे शाखा मिळावी. यासाठी प्रयत्न करत असतात. बऱ्याचवेळा पहिल्या फेरीत हव्या त्या पसंतीचे महाविद्यालय आणि ब्रांच विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यावेळी ते बेटरमेंटचा पर्याय निवडतात. जेणेकरुन पहिल्या फेरीत मिळालेली जागा सुरुक्षित ठेवून ते दुसऱ्या फेरीत सहभागी होता येते.

ऑप्शन फाॅर्म भरण्यासाठी मुदत

पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रियेनंतर शासकीय महाविद्यालयांमधील 10 टक्के जागा अजून रिक्त आहेत. तर खासगी महाविद्यालयातील 50 टक्के जागा भरणे अद्याप बाकी आहेत. उर्वरित फेऱ्यांमध्ये या सर्व जागा भरल्या जातील, अशी माहिती प्रवेश समन्वयक डॉ. एच.आर. शेख आणि प्राचार्या डॉ. माधुरी गणोरकर यांनी दिली. दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहिर करण्यात आली आहे. यानंतर आता 4 सप्टेंबर ऑप्शन फाॅर्म भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

तिसरी फेरी 12 सप्टेंबरला

दुसऱ्या फेरीची अलाॅटमेंट लिस्ट 6 सप्टेंबर रोजी जाहीर होईल. 7 ते 10 सप्टेंबर अलाॅटमेंट निश्चिती, तर 7 ते 17 सप्टेंबर प्रत्यक्ष प्रवेश निश्चिती, तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा 12 सप्टेंबर रोजी जाहीर होतील. याच दिवशी पाॅलीटेक्निकचे वर्ग सुरू होणार आहेत. 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान तिसऱ्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे, 18 ते 22 दरम्यान प्रवेश निश्चिती करून 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान संस्था स्तरावरील प्रवेश होतील. अशी माहिती पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेतील प्रवेश समन्वयकांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...