आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते?:मध्यवर्ती बस स्थानकाची खड्ड्यांमुळे वाईट अवस्था; बस चालकांना करावी लागते तारेवरची कसरत

औरंगाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकाची वाईट अवस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे झाल्याने बस चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

प्रवाशांचे होता हाल

मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज तीनशेवर बस ये जा करतात. एका बसमध्ये 43 ते 45 प्रवासी प्रवेश करतात. दररोज विभागाचे सुमारे पन्नास लाखांवर उत्पन्न मिळते. तरी देखील बसस्थानक व परिसराचा विकास केला जात नाही. परिणामी अतिशय बकाल अवस्था झाली आहे.

रस्त्यांची झाली चाळणी

रस्त्याची तर चळणीच झाली आहे. जागोजागी खडे, त्यात पावसाचे पाणी तुबंते. यात बसचे टायर जावून आदळते. यामुळे बसचे पार्टन पार्ट लवकर खराब होत आहेत. देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढतो. चिखलमय रस्त्यातून बस काढाव्या लागतात. शेकडो प्रवाशांना, पर्यटकांना चिखलमय रस्त्यातूनच वाट काढावी लागते.

अस्वच्छ परिसराचा धोका

बस स्थानक, प्रवासी आसन, डेपोत अनेक ठिकाणी कचऱ्याचे गंज साचलेले आहेत. परिसरात देखील अस्वच्छता आहे. यापासून प्रवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

सिडकोतही खड्डे आणि घाणीचे साम्राज्य

सिडको बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच दोन फुट खोल व तीन फुटापेक्षा जास्त लंबा खड्डा पडलेला आहे. दररोज येथून दोनशेवर बस धावतात. खड्ड्यांमुळे बसस्थानकात बस घेणे व बाहेर काढण्यासाठी चालकांना तारेवरच कसरत करावी लागते. तसचे पटंगणात गवत, घाण साचलेली आहे. याचा फटका सिडको टाऊन सेटरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना व प्रवाशांना बसतो आहे.

लवकरच बुजवले जातील खड्डे

बसस्थानक, आगार परिसरातील खड्डे बुजवण्याचे काम लावकरच हाती घेतली जाईल. अस्वच्छ परिसर का राहतो, याचा जाब संबंधित अधिकाऱ्यांना विचारून पुन्हा अशी चुक होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक, रा.प.मा.औरंगाबाद.