आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना:रुग्णालयातून पळणारा पॉझिटिव्ह रुग्ण भरधाव ट्रकच्या धडकेत ठार, ‘छोटा हाथी’तून न्यावा लागला मृतदेह

चंदनझिराएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जालना शहरामध्ये सामान्य रुग्णालयात सुरू होते उपचार

कोरोना पॉझिटिव्ह असलेला रुग्ण सामान्य रुग्णालयातून कुणालाही न सांगता बाहेर पडला. रोडवरून जात असताना भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना जालना-औरंगाबाद रोडवरील त्रिमूर्तीजवळ ४ मे रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. राजू पंडितराव गायकवाड (४८, भाग्योदयनगर, जालना) असे मृताचे नाव असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राजू यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार घेत होते. परंतु, ४ मे रोजी ते कुणालाच न सांगता रुग्णालयातून बाहेर पडले. ते औरंगाबाद रोडने जात असताना ट्रक (एमएच ०४ बीजी ६४८७) चालकाने वाहन भरधाव चालवत जोराची धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच चंदनझिरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातानंतर काही वेळ वाहतूक जाम झाली होती. परंतु, जाधव यांनी तात्काळ वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी विठ्ठल घुगे (शेवगा ता. अंबड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कांबळे हे करीत आहेत. दरम्यान, मृताची ओळख पटवताना बराच वेळ झाला. नंतर ही मृत व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाल्यानंतर मृतदेह नगर पालिकेच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती कांबळे यांनी दिली.

‘छोटा हाथी’तून न्यावा लागला मृतदेह
सध्या कोरोना असल्यामुळे रुग्णांना ने-आण करताना रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, अपघात झाल्यानंतर पोलिस व स्थानिक नागरिकांनी वारंवार फोन करुनही रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह छोटा हाथी वाहनातून न्यावा लागला आहे. अपघातातील ट्रक पोलिसांनी जप्त करुन चंदनझिरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...