आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडी:प्लॉटवर कब्जा, 5 लाखांची खंडणी मागत वृद्धाला धमकी ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हर्सूल भागात असलेल्या पाच प्लॉटवर चौघांनी कब्जा करत शेख हसन शेख लाल (६७, रा. कबाडीपुरा, बुड्ढी लेन) यांना धमकावत त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. हा प्रकार १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दिल्ली गेट भागात घडला. या प्रकरणी शेख महेबूब शेख महेमूद, शेख उस्मान शेख महेमूद, शेख सुभान शेख महेमूद (रा. जुनाबाजार) आणि शेख हुसेन शेख अकबर (रा. अंबर हिल, जटवाडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्सूल भागातील गट क्र. २४९ मध्ये पाच प्लॉट आहेत. त्यांचे क्षेत्रफळ ४,९५१ चौरस फूट आहे. हे प्लॉट त्यांनी मूळमालक शेख लाल अब्दुल कादर आणि हाजी शेख महेमूद शेख अहेमद यांच्याकडून खरेदी केले होते. शेख हसन यांच्याकडे १९८७ पासून त्याची मालकी आहे. या प्लॉटवर कोणतेही बांधकाम त्यांनी केलेले नाही. दरम्यान, शेख हसन हे पत्नीसह या प्लॉटवर गेले होते. तेव्हा तिथे आरोपींनी, ‘या प्लॉटवर यायचे नाही. तुझ्या प्लॉटची कागदपत्रे आमच्याकडे आहेत. आम्ही हे प्लॉट दुसऱ्याला विकू शकतो. तुला प्लॉट हवे असतील तर आम्हाला पाच लाख रुपये दे नाहीतर आमच्याशी गाठ आहे’, अशी धमकी दिली. याप्रकरणी सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...