आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली कोरोना:मुंबईवरून गावी आलेल्या टपाल कर्मचाऱ्यास गावात आल्याचे कारण विचारत मारहाण, बोरीसावंत येथील घटना

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील बोरीसावंत येथे मुंबईवरून आलेल्या टपाल कर्मचाऱ्यास गावात का आला या कारणावरून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 13) रात्री उशीरा तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील बोरीसावंत येथील शांतीदूत पुरभाजी गायकवाड हे मुंबई येथील विक्रोळी टपाल कार्यालयात कार्यरत आहेत. मुंबई येथे कोरोनाचा कहर वाढत असल्याने ते बुधवारी कुटुंबियांसह गावी आले होते. त्यानंतर त्यांनी हट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी केली. त्यांना होम क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले. मात्र गायकवाड हे त्यांच्या कुटुंबांना गावी सोडून परत मुंबईकडे रवाना होणार होते. मात्र तुम्ही मुंबई येथून गावात का आला या कारणावरून गावातील तिघांनी त्यांना मारहाण केली. या प्रकरणी गायकवाड यांच्या तक्रारीनंतर हट्टा पोलिसांनी गोपीनाथ गायकवाड, सोनाजी गायकवाड व अन्य एका विरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. जमादार राठोड पुढील तपास करीत आहेत.

याच प्रकरणात लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या तक्रारीवरून हट्टा पोलिसांनी पुरभाजी गायकवाड, शांतीदूत गायकवाड व अन्य दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...