आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​नामांतरास विरोध:‘छत्रपती संभाजीनगर’विरोधी आंदोलनात औरंगजेबाचे पोस्टर; इम्तियाज जलील यांचे साखळी उपोषण

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने नुकताच घेतला. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व स्थानिक खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. शनिवारी त्यांच्या नेतृत्वाखालील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ झाला. नामांतरविरोधी भूमिका असलेले अनेक लोक या आंदोलनात सहभागी झाले होते. काही ‘अतिउत्साही’ तरुणांनी शिरकाव करून खासदार इम्तियाज जलील यांच्यासमक्ष औरंगजेबाचे पोस्टर झळकवत ‘जिंदाबाद जिंदाबाद, औरंगाबाद जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी केली. आयोजकांनी त्यांना तातडीने तेथून बाहेर काढले. सोशल मीडियावर द्वेष पसरवणारे मेसेज पसरवू नका, आंदोलनाला गालबोट लावू नका, असे आवाहन इम्तियाज यांनी केले.

फोटो झळकवणाऱ्या तरुणांवर कारवाई करा आंदोलनात फोटो झळकवणाऱ्यांशी एमआयएम पक्षाचा किंवा आंदोलनाचा संबंध नाही. आम्ही सनदशीर मार्गाने उपोषण करत आहोत, पण ते मोडून काढण्यासाठी काही जण हा प्रयत्न करत असावेत. अशा लोकांवर पोलिसांनी कारवाई करावी. इम्तियाज जलील, खासदार

कायदा-सुव्यवस्था राखा : सत्तार कायदा व सुव्यवस्था न बिघडण्याची दक्षता इम्तियाज यांच्यासह सर्वांनीच घ्यावी. नामांतराचा निर्णय वैयक्तिक नाही तर सरकारचा आहे. त्याचा आदर राखावा, असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

प्रशासनाकडे ३५०० आक्षेप अर्ज नामांतराला आक्षेप असणाऱ्यांनी २७ मार्चपर्यंत विभागीय आयुक्तालयात लेखी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यानुसार आतापर्यंत ३५०० जणांनी हरकती दाखल केल्या आहेत.

स्वाक्षरी मोहिमेने मनसेचे प्रत्युत्तर एमआयएमच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी नामांतराच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवली. ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...