आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर मंडळात शुक्रवारी देखभाल-दुरुस्तीसाठी पाच तासांपर्यंत वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. वैशाख सुरू असून तापमान ४० अंश सेल्सियसवर आहे. उकाडा जास्त असून फॅन, कूलर, एसी विजेअभावी बंद होते. उच्च तापमानाने अंग पोळून काढले.
मान्सूनचा अवकाळी पाऊस, वादळ वाऱ्यात शहरातील वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी महावितरणतर्फे देखभाल-दुरुस्तीचे काम केले जात आहे. त्यासाठी शुक्रवारी गारखेडा परिसर, एन-२ ते एन-५ सिडको, हडको, चिकलठाणा, गरवारे, टाऊन हॉल, कैलासनगर, कॅनॉट प्लेस, एलआयसी, सिडको, मनपा कार्यालय, ईएसआयसी हॉस्पिटल, नक्षत्रवाडी, गोलवाडी, पन्नालालनगर आदी भागांतील वीजपुरवठा सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत म्हणजेच चार ते पाच तास सलग बंद ठेवण्यात आला होता.
वीज नसल्याने उकाड्याने शहरवासीयांना चांगलाच घाम फोडला. कामाचाही खोळंबा झाला. नियमित वीज बिलाचा भरणा, अतिरिक्त सुरक्षा ठेवी देऊनही अखंडित व दर्जेदार वीज मिळत नसल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात ते संताप व्यक्त करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.