आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

375 फुट विशाल तिरंग्यासह विद्यार्थ्यांची प्रभातफेरी:किलबिल प्राथमिक शाळेचा​​ आगळावेगळा उपक्रम, सर्वत्र होतेय चर्चा

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिडकीन येथील किलबिल प्राथमिक शाळेच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव व भारतीय स्वतंत्रतेच्या 75 वर्षेपुर्ती निमित्त विशेष स्वरुपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने विद्यार्थी, पालक, गावकरी, शाळा प्रशासनाने प्रभात फेरीतून 375 फुट लांब तिरंगा ध्वज फडकवला. विद्यार्थ्यांनी विविध देशभक्ति पर घोषणांनी परिसर उत्साहाने दणाणुन गेला होता. या प्रभातफेरीचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

भारतीय स्वातंत्र्यास 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हे वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. हर घर तिरंगा फडकवण्याचा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. शाळा महाविद्यालय, शासकीय निमशासकीय कार्यालयातही विविध माध्यमातून त्याची अंमलबजावणी होत आहे. अमृत महोत्सवानिमित्त सर्व शाळाना गावातुन प्रभातफेरी काढण्यात येत आहे. जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याची स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरूपी मनात राहावी, या उद्देशाने हर घर तिरंगा बद्दल जनजागृती करण्यात येत आहे.

लेझीम पथकाचे रंग

यावेळी लेझिम पथकाने कार्यक्रमात रंगत भरली. तिरंगा ध्वजातील विशेष वेशभूषा आकर्षण ठरले. यामध्ये अनेक विद्यार्थी केशरी, पांढरा व हिरव्या रंगाच्या वेशभूशेत होते. उत्साहपूर्ण अशा वातावरणात विद्यार्थी, शिक्षकांची प्रभातफेरी लक्ष वेधून घेत होती.

क्रांतिकारकांची वेशभूषा

या रॅलीची लक्षवेधी बाब म्हणजे 375 फुट विशाल तिरंग्यासह अनेक मुलांनी स्वतंत्र लढ्यातील विविध क्रांतिकारक, स्वतंत्र सैनिक, राष्ट्रीय नेत्यांची वेशभूषा यासोबत देशभक्ति पर गीत, घोषणाने सर्व गावकरी यांचे लक्ष वेधून घेतले. सर्व गावकरी यांना आपआपल्या घरी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सर्व नियमचे पालन करुन तिरंगा ध्वज उभारण्याचे आवाहन करुन रॅलीची सांगता करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...