आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचकल्याणक महोत्सव:व्यावहारिक ज्ञान महत्त्वाचे ; आ. सौभाग्यसागर महाराज

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करता येते, असे मत आचार्य सौभाग्यसागर महाराज यांनी व्यक्त केले.कचनेर येथे चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात आचार्य सौभाग्यसागर महाराज यांच्या उपस्थितीत पंचकल्याणक महोत्सव सुरू आहे. पाचव्या दिवशी भाविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे आचार्याश्री म्हणाले की, आवश्यकतेपेक्षा जास्त ज्ञान मनुष्याला वेडसर बनवते. त्यामुळे मर्यादित ज्ञानासोबत अनुभव, समज, विवेक आदी गोष्टींचीही मानवाला गरज असते. प्रत्येकांसोबत माणुसकीने वागा. तसेच अराधना करताना शरीराची शुद्धी चांगली असली तरच धार्मिक कार्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे, असा सल्लाही त्यांनी दिला. या वेळी भगवंताचा शांतिधारा करण्याचा मान पापडीवाल परिवार, अनिता छाबडा, अमोल पाटणी, चंपाबाई पाटणी यांना देण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येेने भाविकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...